करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कुणबी मराठा असलेल्या नोंदी गाव निहाय संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावे अशी मागणी प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने गोपीनाथ पाटील सर उपस्थित होते. प्रा रामदास.झोळसर यांच्या मागणीला तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत करमाळा तालुक्यातील 118 गावातील प्रत्येक ग्रामपंचायत गावनिहाय तात्काळ मराठी अनुवादित यादी ग्रामपंचायत कार्यालयाला तात्काळ काढून ती यादी ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डवर लावण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील 118 गावांमधील कुणबी मराठा नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत. त्या संदर्भातील यादी शासनामार्फत पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत परंतु सदर यादी संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठी अनुवाद प्रसिद्ध न झाल्याने प्रत्येक गावातील ग्रामस्थ तहसील कचेरी येथे आपली कुणबी मराठीची नोंद बघण्यासाठी कचेरी मध्ये हेलपाटे मारावे लागत आहे त्याच्यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे .याला उत्तम चांगला पर्याय म्हणजे प्रत्येक गावात असणाऱ्या नागरिकांची कुणबी मराठा नोंद असलेले यादी संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डवर ग्रामसेवक यांच्यामार्फत जर लावली तर खऱ्या अर्थाने या गावातील ग्रामस्थांना संबंधित नोंदीची माहिती मिळून आपली नोंद आहे का याचा स्पष्ट आरसाच त्यांच्यासमोर असल्याने नागरिक व प्रशासनाची मोठी गैरसोय दूर होणार आहे आणि ज्यांच्या नोंदी आढळले आहेत त्यांना कुणबी मराठा दाखला घेणे सोयीस्कर होणार आहे त्यामुळे कुणबी मराठा नोंद असलेल्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांना गाव निहाय ग्रामपंचायत कार्यालय यादी प्रसिद्ध केल्यामुळे खऱ्या अर्थाने समाज बांधवाला न्याय मिळणार असल्याने प्रा.रामदास झोळसर यांच्या मागणीचे सर्वत्र कौतुक होत असुन नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.