मुंबई: प्रतिनिधी, केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती बिना लागू केलेले आहे. सदर योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाच्या दिनांक 17 मार्च 2022 व दिनांक 07 जुलै 2023 च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60% महाडीबीटी प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व इतर न परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयाला सात दिवसाच्या आत तात्काळ जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. संबंधित महाविद्यालयाला सन 2021-22 व 22-23 शैक्षणिक वर्षातील भारत सरकार नेतृत्व शिष्यवृत्ती योजना अंतर्गत प्रलंबित रकमेबाबत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अध्ययवत यादी तयार करावी. सदर शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून वर्ग वाचता असलेल्या 60% रकमेबाबत दिनांक 14 मार्च 2022 रोजी च्या शासन निर्णय यातील सर्व सूचनाबाबत संबंधित विद्यार्थ्यांना अवगत करावी. जमा झालेली 60% रक्कम ही पूर्ण 100% रकमेच्या 60 % रक्कम असल्याचे विद्यार्थ्यांना ज्ञात करून द्यावे. केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर वर्ग होत असलेली 60% रक्कम ही विद्यार्थ्यांना जे असलेला निर्वाह भत्ता वगळता उर्वरीत रक्कम महाविद्यालयास अदा करावयाचे असल्याने संबंधित विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात कळवणे गरजेचे आहे. तसेच हजार 2021-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षातील केंद्र शासन 60 % विद्यार्थ्यांना जमा झाला आहे किंवा कसे याबाबत पीआरएमएस प्रणाली वरील ट्रेकिंग संस्थेचा वापर करावा. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केंद्रित 60% रक्कम वर्ग झालेले आहे, अशा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी बँक खात्यातील रक्कम जमा रकमेबाबत विद्यार्थी कडून शुल्काची रक्कम जमा करून घ्यावी. सन 2021-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये बहुतांश महाविद्यालयांनी अनुसूचित प्रवाहातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी तथा महाविद्यालयातील अभ्यास पूर्ण केल्यानंतरही शैक्षणिक कागदपत्र उपलब्ध करून देताना केंद्र हिस्सासाठी टक्के शैक्षणिक शुल्काची रक्कम भरून घेतल्या असल्याबाबत कार्यालयास आणि तक्रार प्राप्त झालेले आहे, तरी सदर बाबतीतही पडताळणी करून विद्यार्थ्यांना केंद्रित करण्यासाठी रक्कम शुल्काची रक्कम भरून घ्यावी तसेच ज्या बँकात त्यामध्ये केंद्रित 60% रक्कम झाले आहे त्यांनी सदर रक्कम महाविद्यालय जमा केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी परिपूर्ण माहिती या कार्यालयात सादर करावी अन्यथा विद्यार्थी /विद्यार्थिनी जमा शिष्यवृत्तीपैकी महाविद्यालय फि शुल्काची रक्कम बँक खाता वर जमा होऊनही महाविद्यालयाला जमा करणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शासकीय कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे महाविद्यालयाची फि शुल्क देऊन शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन परिपत्रकाद्वारे केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…