करमाळा प्रतिनिधी . आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ग्रामपंचायतीचे सर्व कारभार डिजिटल करून पारंपरिक पद्धती बंद करणेचे सूचना आहेत. या अंतर्गत ग्रामपंचायतीचे आर्थिक कामकाज धनादेश द्वारे करण्यात येत होते. धनादेश द्वारे झालेले खर्च कॅशबुक मध्ये नोंदवुन priasoft प्रणाली मध्ये भरण्यात येत होते. 1 एप्रिल 2020 पासून 15 वा वित्त आयोग सुरू झालेला असून केंद्र शासनाने ग्रामपंचायतीचे खर्च धनादेश द्वारे न करता PFMS या आधुनिक बँकिंग प्रणाली मार्फत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक निधीचे अचूक व पारदर्शक नियोजन करिता PFMS प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. याकरिता आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे वित्त आयोगाचे बँक खाते क्रमांक PFMS पोर्टल मध्ये नोंदवून ग्रामसेवक व सरपंच यांचे डिजिटल सिग्नेचर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. करमाळा पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री. श्रीकांत खरात आणि विस्तार अधिकारी आदिनाथ आदलिंगे व महेश पाटील, मनोजकुमार म्हेत्रे व तालुका व्यवस्थापक अजिनाथ घाडगे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याकरिता सातत्याने सूचना देऊन 33 ग्रामपंचायतीचे नोंदणी PFMS पोर्टल वर नोंदणी करून घेतले आहेत.राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीचे नोंदणी pfms वर करमाळा पंचायत समिती मार्फत करण्यात आले.* तसेच करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक. महेश काळे व सरपंच सौ. आशा अंकुश जाधव यांनी PFMS प्रणाली चा व्यवहारात वापर करण्या करिता पुढाकार घेऊन पुरवठादार अथवा कंत्राटदार यांना धनादेश न देता त्याऐवजी त्यांचे बँक अकाउंट मध्ये रक्कम थेट वर्ग केले. *पुणे विभागात सर्वात प्रथम pfms प्रणालीचा वापर करण्याचा बहुमान शेलगाव (क) या ग्रामपंचायतीस प्राप्त झालेला आहे.* ग्रामपंचायतीचे निधी नेमका कोणास व कोणत्या काम करिता खर्च करण्यात आलेला आहे याची माहिती PFMS प्रणाली वरून सामान्य नागरिकास उपलब्ध झालेली आहे. याकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अनिरुद्ध कांबळे साहेब, करमाळा पंचायत समिती सभापती श्री. गहिनीनाथ ननवरे, उपसभापती श्री. दत्तात्रय सरडे व सर्व पंचायत समिती सदस्य व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. चंचल पाटील मॅडम पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी व करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व पंचायत समिती टीम आणि शेलगाव (क) या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांचे अभिनंदन केले आहे. सोलापूर जिल्हयातील ग्रामपंचायतीचे कामकाजात आधुनिकता व पारदर्शकता आणणे करिता जिल्हा परिषद मार्फत सर्वच ग्रामपंचायतीचे कामकाज pfms मार्फत करण्याकरीता विशेष अभियान राबविण्यात येत आहेत.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…