Categories: करमाळा

करमाळ्याचे सुपुत्र उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर

मतदार नोंदणीच्या उदगीर पॅटर्नची राज्यभरात चर्चा : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी करमाळ्याच्या सुपुत्राचे केले कौतुक.

करमाळा प्रतिनिधी 2024 हे वर्ष प्रामुख्याने निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे, ज्यामध्ये लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षात येऊ घातल्या आहेत. निवडणुका म्हटलं की त्यासाठी वापरली जाणारी मतदार यादी ही अद्ययावत असणे फार आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वर्षभर चालते. ज्यामध्ये नवमतदारांची नोंदणी, मयत व दुबार मतदारांची वगळणी तसेच मतदाराचा तपशील दुरुस्तीबाबत काम चालते.

करमाळा तालुक्यातील रावगाव गावचे सुपुत्र श्री. सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर म्हणुन उदगीर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहतात. उदगीर मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये महिलांच्या व युवकांच्या मतदार म्हणून नोंदणीचे प्रमाण खूपच कमी होते. ही बाब उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी युवक मतदार नोंदणी मध्ये उदगीर मतदार संघातील 58 शाळा – कॉलेज वर सुमारे सात हजार विद्यार्थ्यांची नव मतदार म्हणून नोंदणी पूर्ण केली.

तसेच उदगीर मतदार संघाचे लिंग गुणोत्तर 887 होते जे की इतर मतदारसंघ व राज्याच्या सरासरीपेक्षा खूपच कमी होते कारण महिला मतदारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदगीर यांनी उदगीर मतदार संघातील एक लाख 95 हजार महिलांचे सर्वेक्षण बचत गट प्रतिनिधी व अंगणवाडी ताई यांच्यामार्फत करून घेतले, ज्यामध्ये 9500 मतदार नोंदणी न केलेल्या महिला आढळून आल्या. ज्यांची लगेचच बीएलओ मार्फत मतदार नोंदणी पूर्ण करून घेण्यात आली. त्यामुळे उदगीर मतदार संघाचे लिंग गुणोत्तर 887 वरून 911 म्हणजे तब्बल 24 ने वाढले आहे. याबद्दल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यापूर्वीच उदगीर मतदार संघाचे या कामाबद्दल कौतुक केले होते. अशाप्रकारे उदगीर मतदार संघामध्ये जून 2023 ते डिसेंबर 2023 या सहा महिन्यांमध्ये 18000 नव मतदारांची नोंदणी पूर्ण करून घेण्यात आली.

गेल्या सहा महिन्यांमध्ये उदगीर मतदार संघातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी,तलाठी, अंगणवाडी ताई, बचत गट प्रतिनिधी आणि सर्व बीएलओ यांनी केलेल्या अविरत आणि अचूक कामामुळे हा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया करमाळ्याचे भूमिपुत्र आणि उपविभागीय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी दिली.

उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर श्री. सुशांत शिंदे यांचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी विशेष अभिनंदन केले तसेच करमाळा तालुक्यातील राजकिय मान्यवर हस्ती व रावगाव आणि पंचक्रोशीतील मान्यवरांकडुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago