करमाळा प्रतिनिधी श्रीराम हे संपुर्ण जगाचे आदर्श भगवान आहेत त्यांचा आदर्श येणाऱ्या काळात जगाला तारणार असुन संस्कारक्षम बनण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच योग्य संस्काराची गरज असून अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची जोड उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे असे मत जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ स्वातीताई बिले यांनी व्यक्त केले. सुमारे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्या मध्ये रामाची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुलांनी श्रीराम, सिता व लक्ष्मण यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. सर्व शाळेतील मुलांनी भगव्या रंगाची कपडे परिधान केले होती. या कपड्यांमध्ये मुले खूप उठून दिसत होती. या कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रतिमेचे पूजन शाळेच्या संचालिका डॉक्टर स्वाती बिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांनी राम राम जय जय राम या मंत्राचे उच्चारण केले. यावेळी मुलांना राम रक्षा स्तोत्र ऐकवण्यात आले. यामुळे शाळेतील सर्व वातावरण आनंदमय झाले होते. या कार्यक्रमाचा हेतू मुलांच्या मनावरती संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असते हे बिंबवणे गरजेचे आहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे म्हणून जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल ने हा अनोखा उपक्रम आपल्या शाळेत राबवला होता. कार्यक्रम संपल्यानंतर मुलांना शाळेच्या मैदानावरती घेऊन मुलांना उभे करून धनुष्यबाण व त्यामध्ये श्रीराम असे कलाकृती सादर करण्यात आली व त्याचे छायाचित्र टिपण्यात आले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक दादासाहेब खराडे ,रेश्मा बैरागी, सतीश कोंडलकर, तानाजी हरणावळ व इतर शिक्षकांनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम आनंदात पार पाडला.