करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 31 जानेवारीनंतर प्रकरण मार्गी लागणार असुन तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे असे मत प्रा रामदास झोळसर यांनी व्यक्त केले. मकाई सहकारी साखर कारखाना थकीत ऊस बिलासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी चर्चा करून मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळण्यासंबधी आश्वासन मिळाल्यामुळे थकीत ऊस बिल आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी विनंती तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी प्रा रामदास झोळसर शेतकरी बांधवांना केल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.करमाळा तहसील कार्यालयावर प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखालील आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळत नाही असा पवित्रा 26 जानेवारीला आंदोलन करण्यात आले .या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते दशरथ आण्णा कांबळे ,कामगार नेते ॲड राहुल सावंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, प्रा राजेश गायकवाड, अंजनडोहचे उपसरपंच शहाजी माने हरिदास मोरे, गणेश वाळुंजकर, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे आदींच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.आपल्या कुटुंबासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुमारे अडीचशे तीनशे शेतकरी बांधवांनी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासनाने विशेष खबरदारी घेऊन सोलापूर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशावरून कडक फौजफाटा बंदोबस्तात या आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने संप्पन झाले.पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवुन परिस्थिती व्यवस्थित हाताळली तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मकाई सहकारी साखर कारखाना शिष्टमंडळाशी प्रा.रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखालील चर्चा केली.31 जानेवारीला शेतकऱ्यांना ऊस बिल मिळेल अशी ग्वाही मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ जिल्हाधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.मकाई सहकारी साखर थकीत ऊस बिल गेल्या दिड वर्षांपासून थकित होते परंतु प्रा.रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखालील ऊस बिल मिळण्यासाठी धरणे आंदोलन, थु थु,बोंबाबोंब आंदोलन, साखळी उपोषण मार्गानै अडीच महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळाले असुन प्रा.रामदास झोळसर त्यांच्या सहकाऱ्यांचे शेतकरी आभार मानले आहेत.मात्र 31 तारखेपर्यंत थकीत ऊस बिल शेतकरी बांधवांना न मिळाल्यास चेअरमन संचालक कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवुन थकीत ऊस बिल देण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ थकीत ऊस कसल्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करतील असा विश्वास प्रा.रामदास झोळ सर यांनी व्यक्त केला आहे.