Categories: Uncategorized

दत्तकला शिक्षण संस्थेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी  दत्तकला शिक्षण संस्थेत भारताचा ७५वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी उत्साहात पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास झोळसर, उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिव सौ. माया झोळ मॅडम , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. विशाल बाबर सर,सर्व विभागांचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची भाषणे, साहसी खेळ, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. तसेच दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका प्रा. वर्षा झोळ यांचे भाषण झाले.
या प्रंसगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थाध्यक्ष श्री. रामदास झोळ सरांनी भारताच्या बदलत्या प्रगतीचा आढावा घेतला, एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना देशासमोर असणाऱ्या आव्हानांवर त्यांनी वास्तवदर्शी भाष्य केले. या वेळी शैक्षणिक क्षेत्रात बदलत्या शैक्षणिक धोरणा नुसार शिक्षकांची भूमिका काय असावी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.. अशा रीतीने संस्थेत भारताचा ७५वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिव सौ माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.विशाल बाबर सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले व संपूर्ण कार्यक्रम आनंदात, उत्साहात संपन्न झाला.

saptahikpawanputra

Recent Posts

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

8 hours ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

1 day ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

3 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

3 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago