Categories: करमाळा

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण देणारे एकनाथ शिंदे. मराठा समाजाचे एकमेव मुख्यमंत्री-राहुल कानगुडे

करमाळा प्रतिनिधी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण देणारे एकनाथ शिंदे. मराठा समाजाचे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे मत शिवसेना विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे यांनी व्यक्त केले .मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मराठा योद्धा  मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण लढा उभारला होता मराठा समाजाला आरक्षण मिळून गेले शिवाय स्वस्त बसणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या मराठा समाजाचे लोकनेते जरांगे पाटील यांच्या आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे .मराठा समाजाचे मुख्यमंत्री म्हणून समाजाचे खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे.महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार अशी शप्पथ घेतली होती. तो शब्द पाळून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाला ओबीसी मधूनच कुणबी म्हणून आरक्षण दिले आहे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून दिल्याबद्दल देवळाली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पेढे वाटून उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जयघोषात मनोज जरांगे पाटील  जिंदाबाद म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो असा नारा देत देवळाली येथे मराठा समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने फटाक्याची आतिशबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देऊन आरक्षण देण्याचा शब्द पाडल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी देवळाली येथील मराठा समाज बांधव बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago