करमाळा तालुकास्तरीय इंग्रजी भाषा कार्यशाळेचे यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजन……… विद्यार्थी व शिक्षकांना होणार प्रतिथयश तज्ञांचे मार्गदर्शन..

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुकास्तरीय इंग्रजी भाषा कार्यशाळेचे यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजन……… विद्यार्थी व शिक्षकांना होणार प्रतिथयश तज्ञांचे मार्गदर्शन…… यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा, शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा व इंग्लीश लँग्वेज टीचर्स असोसिएशन करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील व्यावसायिक संधी ओळखुन सक्षम विद्यार्थी घडवताना इंग्रजी भाषेची भूमिका अनन्यसाधारण असल्यामुळे शिक्षकांपुढील आव्हाने व उपाययोजना तसेच विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढावा या हेतूने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रा.डॉ. गणेश करे- पाटील यांचे अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. या कार्यशाळेमध्ये पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यास मंडळ पूणे चे सदस्य श्रीधर नागरगोजे , संगमेश्वर महाविद्यालयाचे मा.उपप्राचार्य प्रा.धनप्पा मेत्री , प्रेरक व्याख्यात्या डॉ. सुनिता दोशी , प्रोलक्स कंपनीच्या डायरेक्टर व प्रसिद्ध डॉ. प्रचिती पुंडे या तज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यशाळा यशकल्याणी सेवाभवन पूणे रोड, करमाळा येथे सोमवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायं 4 या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुखदेव गिलबिले यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

8 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

3 days ago