म्हणून आता धरणग्रस्त रस्त्यावर उतरले आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी भिगवण ता.इंदापूर येथे सागर हाॅटेल समोर सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येणार आहे.हा रास्ता रोको करमाळा ,इंदापूर, कर्जत व दौंड तालुक्यातील धरणग्रस्त नागरिक एकत्रीत करणार आहेत.हा रास्ता रोको यशस्वी करण्याच्या पार्श्वभूमीवर जलाशय काठावरील नागरिक गावोगावी बैठका घेऊन भिगवण ला जाण्याचे नियोजन करीत आहेत.आज वांगी नं 1 येथे सायंकाळी पाच वाजता नियोजन बैठक पार पडली .या बैठकीत वांगी परिसरातील ढोकरी,भिवरवाडी ,बिटरगाव, वांगी नं1,3,4,नरसोबावाडी ,पांगरे,आदी गावातून पन्नास ते साठ चार चाकी वाहनातून शेकडो लोक जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीस उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर, उपाध्यक्ष भारत साळुंके ,भा ज पा चे नूतन जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील,मकाई चे संचालक सचिन पिसाळ, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,वांगी ग्रामपंचायतीचे सदस्य दत्ताबापू देशमुख, तानाजी देशमुख,सोसायटीचे संचालक विकास पाटील, सुधीर देशमुख, रावसाहेब देशमुख, देवा तळेकर, नवा शिनगारे,पैलवान शिवाजी खरात,भारत सलगर,गणेश खरात,विष्णुपंत वाघमारे,बाळू महानवर, दादा भोसले ,आबा सरडे, वैभव पाटील, गणेश पाटील, भारत रोकडे,चंद्रकांत राम अण्णा देशमुख, आदि बहुसंख्येने उपस्थित होते.उध्या कंदर पंचक्रोशीतील नागरिकांची सकाळी 9 वाजता बैठक आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…