या कार्यक्रमाप्रसंगी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगले काम केल्याबद्दल माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी युवा नेते भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप तालुका अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे ,राजकुमार पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की देशाला जर समृद्ध आणि संपन्न करायचे असेल तर देशाला नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजपशिवाय पर्याय नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगले काम केले असून त्यांचे इतकी उपस्थिती करमाळा तालुक्यात इतर कुठल्याच खासदारांनी दिली नाही. पूर्वीचे खासदार निवडणुकीला यायचे ते पुढे पुढच्या निवडणुकीला भेटायचे परंतु जनतेशी सदैव संपर्क ठेवून काम करणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक आपली ओळख निर्माण केली आहे. एवढा मोठा मतदारसंघाचा आवाका असतानाही जनतेच्या सदैव संपर्कात असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर असून भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर आपण नक्कीच त्यांना मताधिक्याने निवडून देऊ पक्ष ज्याला उमेदवारी त्याचे आदेश मानून आपण काम करणार असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की भाजपने जरी मला उमेदवारी देऊन निवडून दिले असले तरी मी आपल्या सर्वांचा खासदार आहे .करमाळा तालुक्यातील रेल्वेचे प्रश्न कुकडीचे पाणी आणण्याचे काम आपण केले असून नीरा नदीचे पाणी उजनीत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मांगी तलावाचा कुकडीमध्ये समावेश करण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. जनता दरबार ,कोरोना काळातही अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले असून यापुढेही उर्वरित गाव पातळीवरच्या सर्व कामांना विकास निधी देऊन उर्वरित कामे आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक भाजपचे जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केले . यावेळी अण्णासाहेब पवार, युसुफ शेख सर, ॲड नवनाथ राखुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कामाचे सूत्रसंचालन भागडे सर यांनी केले तर या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील जगताप गटाचे कार्यकर्ते तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सचिव व्यापारी नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यातील विविध विकासाची कामे केली असून यापुढेही करमाळा तालुक्यातील रखडलेले कामे आपण पूर्ण करावीत आजच्या कार्यक्रमाला जरी उशीर झाला असला तरी विकास कामांना उशीर होऊ देऊ नका मी मार्गदर्शक माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव सेवेत राहणार असल्याचे शंभूराजे जगताप यांनी सांगितले.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…