Categories: करमाळा

गाडगे महाराजांचे तत्त्वज्ञान समाजासाठी प्रेरणादायी असुन  माणसाची मने स्वच्छ करुन समाजाला मानवतेची शिकवण देऊन समाजाला समृद्ध करण्याचे काम दिशादर्शक -फुलचंद नागटिळक

करमाळा प्रतिनिधी गाडगे महाराजांचे तत्त्वज्ञान समाजासाठी प्रेरणादायी असुन  माणसाची मने स्वच्छ करुन समाजाला मानवतेची शिकवण देऊन समाजाला समृद्ध करणारे संत गाडगेबाबा आधुनिक काळातील समाजसुधारक संत होते असे मत आधुनिक संत गाडगेबाबा म्हणून काम करत असलेले फुलचंद नागटिळक यांनी व्यक्त केले.करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत कोर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास…ग्राम व शहर विकास…हे ब्रीद घेऊन मौजे कोर्टी येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना स्वच्छतेचे दूत असणारे आधुनिक गाडगेबाबा फुलचंद नागटिळक यांनी’ मी गाडगे महाराज बोलतोय’ या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीरंग मेहेर साहेब हे होते. फुलचंद नागटिळक हे आधुनिक गाडगे महाराज आहेत.त्यांनी आपल्या प्रबोधन पर व्याख्यानातून कोर्टी गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला.तसेच गाडगे महाराजांप्रमाणे कोर्टीतील घराघरात जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.यावेळी गावातील लहान मुले सुद्धा त्यांच्या ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ‘या भजनात दंग होऊन गेली होती.प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांची मने त्यांनी स्वच्छ केली.याबरोबरच पर्यावरण संवर्धन काळाची गरज, नारीशक्तीचा सन्मान, शेतकरी वाचवा,मुली वाचवा,मुला मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, मुले हीच आपली संपत्ती आहेत, दारू पिऊ नका, रीन काढून सण करू नका,अंधश्रद्धेला मूठ माती द्या याबद्दल प्रबोधन केले. तसेच देव दगडात नसून माणसात आहे हे गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान लोकांच्या गळी उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डी. एस. जाधव यांनी मानले या कार्यक्रमासाठी मकाईचे संचालक आशिष गायकवाड,उपसरपंच नाना झाकणे, भर्तरीनाथ अभंग,राजेंद्र अभंग महाराज,ग्रामपंचायत सदस्य,गावातील ग्रामस्थ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. जयंत भांगे प्रा. मुन्नेश जाधव बाबू चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago