Categories: करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार -प्रा.रामदास झोळसर

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप करून अद्यापही शेतकरी‌ सभासदाला बिल न मिळाल्यामुळै शेतकरी सभासदांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून ऊस बिल तात्काळ देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक रामदास झोळसर, शेतकरी कामगाराचे नेते दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश वाळुंजकर यांनी दिला आहे. याबाबतचे ऊस बिल मागणी निवेदन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम 2023 -24 मध्ये आम्ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिलेला होता. सदर गाळप झालेल्या उसाचे बिल अद्याप आम्हाला मिळाले नाही.सध्या कारखाना बंद झाला असून साखर मॉलिसीस पदार्थ यांची विक्री प्रोसेस सध्या चालू आहे . या विक्रीतून येणाऱ्या पैशांमधून सर्वप्रथम आम्हा शेतकऱ्याचे देणे असलेले बिल आम्हा सर्वप्रथम प्राधान्याने देण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली असून सदर मागणीला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मान्य करत आदिनाथ सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक यांना सदर बिल देण्याविषयीचे आदेश तहसील कार्यालयाचे पत्र दिले असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची साखर माॅलिसिस पदार्थ विक्री झाल्यानंतर रामदास झोळसर व त्यांच्या सहकारी शेतकऱ्याची तात्काळ बिल देण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. तहसीलदार शिल्पाताई ठोकळे मॅडम यांना दिलेल्या निवेदनानुसार योग्य ते कार्यवाही प्रशासनाकडून झाली असून याची आदिनाथ सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक व प्रशासक यांनी दखल घेऊन आम्हाला ऊस बिल न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक रामदास झोळ सर व त्यांचे सहकारी शेतकरी सभासद यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago