राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे साहेब, राज्यातील युवकांचा बुलंद आवाज युवक प्रदेशाध्यक्ष सुरज (दादा) चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेशदादा पाटील, कार्यकुशल प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे, प्रदेश सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील, सोलापूर जिल्हयाचे नेते आमदार संजय (मामा) शिंदे, पश्चिम महारष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे, सोलापूर जिल्हा निरीक्षक संग्राम पाटील व सोलापूर जिल्हयातील सर्व आमदार, मा.आमदार, जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात पक्षाच्या जिल्हयातील सर्व जुन्या नव्या संवगडयांना सोबत घेवून सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्याचा आम्हा सर्व युवकांचा निर्धार असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी व्यक्त केले. देशाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाध्यक्ष म्हणुन माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला पात्र राहुन जिल्हयातील युवक आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून आगामी लोकसभा व विधानसभा तसेच नगरपालिका, जिल्हा परिषद व सहकार क्षेत्रातील सर्व निवडणुका डोळयासमोर ठेवून जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एक चा राजकीय पक्ष बनून आम्ही दाखविलेला विश्वास सार्थ करु असे जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी सांगितले
सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी आमदार व खासदार, जेष्ठ अनुभवी नेते मंडळी तसेच माजी पदाधिकारी यांचेशी विचारविनिमय करुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सोलापूर जिल्हा कार्यकारणी त्यांनी आज जाहिर केली. यामध्ये त्यांनी सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा पातळीवरील सर्व निवडी जाहीर केल्या. आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका मध्ये पक्षाला जास्तीत जास्त यश मिळविण्याच्या दृष्टीकोनातून. जिल्हयातील सर्व नुतन तालुकाध्यक्ष, नुतन शहराध्यक्ष, जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी यांनी पक्षातील अनुभवी नेते व कार्यकर्ते यांचेशी समन्वय राखुन तत्काळ आपल्या तालुक्याची कार्यकारणी तसेच पक्षाची बुथयंत्रणा अधिक प्रभावी करावी अशी सर्व पदाधिकारी यांना त्यांनी सुचना केली आहे. तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पहाणी करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये लवकरच युवक निरीक्षकाची नेमणुक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सर्व समावेशक कार्यकारणी जाहिर करत असताना जिल्हयातील सर्व जुन्या नव्या संवगडयांना विश्वसात त्यांनी घेतले आहे. परंतु तरीही कार्यकर्त्यांशी संवाद आणि चर्चा करुन या मध्ये आवश्यकता पाहून या कार्यकारणीमध्ये वाढ करता येईल असे ही यानिमित्ताने त्यांनी जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेवेळी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंखे- पाटील, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राजेंद्र हजारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…