Categories: करमाळा

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक ॲवार्ड प्रदान करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

करमाळा प्रतिनिधी इंग्रजी साहित्य लेखन करणाऱ्या लेखकांचा यशकल्याणी च्या वतीने होणार गौरव . इंग्रजी भाषा कार्यशाळेत करिअर व भविष्यातील संधी या विषयावर डॉ. प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. गणेश करे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय इंग्रजी भाषा कार्यशाळेमध्ये हा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर समुपदेशक व सुप्रसिद्ध वक्त्या डॉ. सुनिता दोषी , संगमेश्वर महाविद्यालय सोलापूरचे मा.उपप्राचार्य प्रा.डॉ. धनाप्पा मेत्री सर, लेखिका व प्रोलक्स कंपनीच्या डायरेक्टर डॉ. प्रचिती पुंडे , पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पूणेचे इंग्रजी भाषा तज्ञ प्रा. श्रीधर नागरगोजे सर, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. राजकुमार पाटील , इंग्रजी विषय संघटनेचे सोलापूर जिल्हा मा. अध्यक्ष श्री.गुरुनाथ मुचंडे , प्रा. भिष्माचार्य चांदणे, उपस्थित होते. तसेच पंचायत समिती करमाळा चे इंग्रजी विषय समन्वयक श्री. रेवण्णाथ आदलिंग, नवनियुक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, इंग्लीश टीचर्स असोसिएशन करमाळा तालुका अध्यक्ष श्री.कल्याणराव साळुंके, सचिव श्री. गोपाळराव तकीक- पाटील , सहसचिव श्री.मारूती जाधव , प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबिले , प्रा. विष्णू शिंदे, प्रा. जयेश पवार, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक बांधव आणि सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व सर्व तालुका अध्यक्ष व सचिव शिक्षक उपस्थित होते. पंचवीस हून अधिक पुस्तके लिहीणाऱ्या डॉ.प्रचिती पुंडे यांनी आपल्या लेखनात मनाचे आरोग्य या विषयी सविस्तर लेखन केलेले आहे याच कार्याची दखल घेत या वर्षीचा इंस्पीरेशनल बूक ॲवार्ड 2024, देऊन सन्मान करण्यात आला. यापुढे करमाळा तालुक्यातील इंग्रजी भाषेतून लेखन करणाऱ्या लेखकांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जाणार असल्याचे प्रा.डॉ.करे पाटील यांनी जIहीर केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुखदेव गिलबिले, प्रा.विष्णू शिंदे प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी केले तर आभार सहसचिव प्रा. मारूती जाधव यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago