Categories: करमाळा

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक ॲवार्ड प्रदान  करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान.

करमाळा प्रतिनिधी इंग्रजी साहित्य लेखन करणाऱ्या लेखकांचा यशकल्याणी च्या वतीने होणार गौरव इंग्रजी भाषा कार्यशाळेत करिअर व भविष्यातील संधी या विषयावर डॉ. प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. गणेश करे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय इंग्रजी भाषा कार्यशाळेमध्ये हा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर समुपदेशक व सुप्रसिद्ध वक्त्या डॉ. सुनिता दोषी , संगमेश्वर महाविद्यालय सोलापूरचे मा.उपप्राचार्य प्रा.डॉ. धनाप्पा मेत्री सर, लेखिका व प्रोलक्स कंपनीच्या डायरेक्टर डॉ. प्रचिती पुंडे , पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पूणेचे इंग्रजी भाषा तज्ञ प्रा. श्रीधर नागरगोजे सर, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. राजकुमार पाटील , इंग्रजी विषय संघटनेचे सोलापूर जिल्हा मा. अध्यक्ष श्री.गुरुनाथ मुचंडे , प्रा. भिष्माचार्य चांदणे, उपस्थित होते. तसेच पंचायत समिती करमाळा चे इंग्रजी विषय समन्वयक श्री. रेवण्णाथ आदलिंग, नवनियुक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, इंग्लीश टीचर्स असोसिएशन करमाळा तालुका अध्यक्ष श्री.कल्याणराव साळुंके, सचिव श्री. गोपाळराव तकीक- पाटील , सहसचिव श्री.मारूती जाधव , प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबिले , प्रा. विष्णू शिंदे, प्रा. जयेश पवार, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक बांधव आणि सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व सर्व तालुका अध्यक्ष व सचिव शिक्षक उपस्थित होते. पंचवीस हून अधिक पुस्तके लिहीणाऱ्या डॉ.प्रचिती पुंडे यांनी आपल्या लेखनात मनाचे आरोग्य या विषयी सविस्तर लेखन केलेले आहे याच कार्याची दखल घेत या वर्षीचा इंस्पीरेशनल बूक ॲवार्ड 2024, देऊन सन्मान करण्यात आला. यापुढे करमाळा तालुक्यातील इंग्रजी भाषेतून लेखन करणाऱ्या लेखकांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जाणार असल्याचे प्रा.डॉ.करे पाटील यांनी जIहीर केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुखदेव गिलबिले, प्रा.विष्णू शिंदे प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी केले तर आभार सहसचिव प्रा. मारूती जाधव यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

श्री कमलाभवानी मंदिरात २ हजार महिलांचा दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा; विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…

9 hours ago

नेरलेची एसटी आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा ठिय्या आंदोलन औदुंबर राजेभोसले यांचा एसटी महामंडळाला इशारा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…

11 hours ago

करमाळ्यात १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा

  करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…

12 hours ago

करमाळा पोलिसांचा धडाका; १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि मोटारसायकल चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत

करमाळा  प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…

1 day ago

करमाळ्याच्या मुथा नॉलेज फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दमदार कामगिरी; 57 पैकी 48 विद्यार्थ्यांचा गौरव

  करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…

2 days ago

श्रावणात ‘हर हर महादेव’चा जयघोष; करमाळ्याचे श्री खोलेश्वर महादेव मंदिर भक्तीने उजळले पुरातन वास्तू, रथोत्सव आणि शिवनाम सप्ताहाची परंपरा आजही कायम

करमाळा  प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…

4 days ago