Categories: करमाळा

करमाळ्यात तुरीचा तोरा वाढला; साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडला ! १०५९१ इतका उच्चांकी दर माजी आमदार जयवंतराव जगताप

*करमाळा प्रतिनिधी* करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीमधे प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच असून शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत १०५९१ इतका उच्चांकी दर मिळाला आहे . शासन निर्धारीत हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून शेतकऱ्यांनी आपला तुरीसह अन्य शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे . सध्या तुरीची दररोज सर्वसाधारण पणे पाचशे कट्टे च्या घरात आवक होत असून दर वाढतच आहेत . तुरीला सरासरी दहाहजार व कमाल साडे दहा हजारांहून अधिक दर मिळत आहे . तुरीसोबतच ज्वारी , हरभरा व मकेची देखील आवक आता वाढत आहे . तुरीच्या सरासरी उत्पादनात झालेली घट , तुरीची मागणी यामुळे दरात वाढ झालेली दिसत आहे . करमाळा बाजार समितीमधे सध्या दररोज पन्नास लाखाची उलाढाल होत आहे . दुष्काळी परिस्थितीमुळे ओस पडलेल्या करमाळा बाजार पेठेवर याचा काही अंशी का होईना सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती माजी आ. जगताप यांनी दिली .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

1 day ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago