Categories: करमाळा

भाजपाचे सुहास घोलप यांच्या घरी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची सपत्नीक कौटुंबिक सदिच्छा भेट…

करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक करमाळ्यातील भाजपाचे सुहास घोलप यांच्या घरी कौटुंबिक भेट घेतली.
यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर,माढा लोकसभा मतदार संघाचे प्रभारी राजकुमार पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, राज्य निमंत्रित सदस्य दीपक चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कुंभार, व्यापारी आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया, माजी सभापती बापूराव गायकवाड, भिवरवाडीचे सरपंच शेळके, लोकमानसचे सहसंपादक नितीन घोडेगावकर, सोशल मीडिया तालुकाप्रमुख नितीन कांबळे, ऍड प्रियल अगरवाल, वनराज घोलप, वैभव सपकाळ, संघर्ष दयाळ, संग्राम दयाळ, माजी महिला प्रमुख भाग्यश्री कुलकर्णी, अधिराज घोलप, शार्दुल घोलप आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर भेटी दरम्यान कौटुंबिक चर्चा झाली. परंतु काही नागरिकांचे तसेच कार्यकर्त्यांचे कामे होती ते खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी लागलीच पूर्ण केली खासदारांनी ताबडतोब कामा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कामाची पूर्तता करण्यास बजावले. तसेच नगरपालिका संदर्भात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नगरपालिके साठी राखीव निधी उपलब्ध आहे. त्या कामासंदर्भात मला सांगा त्याची मी पूर्तता करतो असे सांगितले.यावरूनच त्यांची कार्य तत्परता दिसून येते त्यांच्या सपत्नीक येण्याने घोलप कुटुंबीयात उत्साहाचे व कौटुंबिक वातावरण तयार झाले होते. त्याचबरोबर छोटेखानी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमही संपन्न झाला. तसेच आलेल्या पाहुण्यांचा घोलप कुटुंबीयांकडून आदर तिथ्य सत्कार सन्मान करण्यात आला..

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago