Categories: करमाळा

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात बागल गटाला खिंडार… शेतकरी मेळावा व विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश …


करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या फिसरे- हिसरे – हिवरे – गौंडरे या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते व करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली काल दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी फिसरे येथे झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन फिसरे येथे केले होते. या मेळाव्यात करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
हिवरे येथील श्री.अमोल आजिनाथ फरतडे यांचे नेतृत्वाखाली सरपंच दत्तात्रय घाडगे, उपसरपंच शिवाजी खाडे ,माजी उपसरपंच दिलीप फरतडे, ग्रामपंचायत सदस्य अतुल फरतडे ,नामदेव जगताप, हनुमंत फरतडे, मोतीराम जगताप ,तात्या फरतडे, शशिकांत मगर, शिवाजी फरतडे ,दिगंबर काळे ,केशव विटुकडे ,वसंत काळे, नागनाथ शिंदे, भास्कर पाटील, विश्वास फरतडे, सुनील पाटील ,जालिंदर फडतरे, हनुमंत चव्हाण, आप्पा शिंदे , दीपक लावंड ,नागनाथ डवले, लक्ष्मण घाडगे ,दत्तात्रय विटुकडे ,तुकाराम शिंदे, दादासाहेब फरतडे जालिंदर फरतडे,सुनिल फरतडे,कमलाकर फरतडे,हनुमंत कांतीलाल फरतडे,आभिमान ओहोळ,ओंकार पुजारी,दादा सरवदे,अनिल शिंदे, बापू लोकरे, गणेश माने,दिपक विटुकडे,संजय मगर,महादेव मगर,दिनेश पाटील,भाऊसाहेब पाटील,आबाराजे डोले,
नवनाथ खाडे ,दादासाहेब फरतडे या कार्यकर्त्यांनी भरत भाऊ अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली बागल गटातून आ. संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात बागल गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच चंद्रकांत काका सरडे, दशरथशेठ घाडगे, एड. राहुल सावंत, डॉ. हरिदास केवारे, सतिश बापु शेळके, भारत रोकडे साहेब, उद्धवदादा माळी, नानासाहेब निळ (सर), तानाजी (बापू) झोळ, नानासाहेब मोरे, नितीनराजे भोसले, तात्यामामा सरडे, सुजित (तात्या) बागल, राजाभाऊ देशमुख, सुहासनाना रोकडे, आशिष गायकवाड, सोमनाथ रोकडे, अनिल जगदाळे, किरण फुंदे, अभिषेक आव्हाड, धनंजय मोरे, आशपाक जमादार, प्रकाशनाना थोरात, शितल क्षीरसागर, उदय ढेरे, रुपालीताई अंधारे, रविंद्र गायकवाड (सरपंच सौंदे) स्नेहलताई अवचर, गोफणे सर, तात्यासाहेब शिंदे (सरपंच-कोळगाव) सुभाष हनपुडे (सरपंच-गौंडरे), मयूर रोकडे (सरपंच-वांगी नं.2) उमेश मगर (माजी सरपंच, हिवरे), नवनाथ जगदाळे (सरपंच-हिसरे) हनुमंत रोकडे (सरपंच-फिसरे) समाधान दोंड (सरपंच-नेरले) आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरतभाऊ अवताडे यांनी केले .2019 ते 2024 या कालावधीत केलेल्या विकासकामांचा आढावा आमदार संजयमामा शिंदे यांनी मांडला. अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी गेल्या १० वर्षात करमाळा तालुका १० वर्ष पाठीमागे गेला होता त्याला पूर्वपदावर आणून ५ वर्षांनी पुढे घेऊन जाण्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांनी केले .येणाऱ्या काळातही आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व करमाळा तालुक्याला आवश्यक असल्याचे सांगून मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभा राहावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले. याप्रसंगी डॉ.विकास वीर ,रवी दादा गायकवाड, समाधान दौंड, भाऊसाहेब अडसूळ, गोफणे सर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या फिसरे येथील जिजाऊ महिला शेतकरी गटाचा सन्मान यावेळी आ. संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

11 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

19 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

20 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago