करमाळा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस करमाळा युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच पांजरपोळ येथील गो शाळेस चारा वाटप करण्यात आला.
यावेळी बोलताना युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड म्हणाले की, शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आलेख चढता ठेवण्यासाठी आम्ही युवा सैनिक कार्य करणार आहोत. प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची पुनर्बांधणी करणार असून शिवसेनेची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार आहे. तसेच युवकच क्रांती घडवू शकतात त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा या निवडणुकात युवा सेनेची मजबूत फळी करमाळा तालुक्यात उभा करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका प्रमुख देवानंद बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे,
महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, रुपाली शिंदे, देवळालीचे युवा नेते अमोल शिंदे, वरकटणेचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे, अनिल फाटके, पप्पू चोरमले, आदेश नरुटे, आण्णा यादव, खंडू जगताप, हनुमंत रंदवे, विजय हजारे आदि युवा सैनिक उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…