Categories: करमाळा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्या महाराष्ट्र बंद सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने उद्या करमाळा बंदचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे शासनाकडून काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ  अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या मागणीला समर्थनार्थ  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्या 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या मागणीला सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला असून याबाबत त्यांनी निवेदन दिले असून करमाळा शहर व तालुक्यामध्ये शांततेत बंद पाळण्यात येणार आहे . करमाळा शहर व तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी  व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊन बंद पाळावा असे आवाहन सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

21 hours ago

कारगिल भवनावरील तोडफोडीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी – अक्रुर शिंदे

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील कारगिल भवनावर चिखलफेक करून इमारतीच्या काचा फोडण्यात आल्याच्या घटनेबाबत करमाळा…

2 days ago

पंढरपूर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर सेवानिवृत्त

  करमाळा प्रतिनिधी : पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर हे…

2 days ago

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला UGC कडून ‘स्वायत्त’ (Autonomous) दर्जा; शैक्षणिक क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा

  करमाळा प्रतिनिधी स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक…

2 days ago

भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात संघटन बळकटीसाठी काम करणार – जितेश कटारिया

  करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चिवटे यांची विजय…

2 days ago