करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या करमाळा तालुका समृद्ध करण्यासाठी करमाळा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य अरूण अडसुळ यांनी व्यक्त केले. शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी करमाळा येथील हाॅटेल राजयोग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मी करमाळ्याचा खुद्द रहिवासी असुन करमाळा तालुक्याशी माझे मातीचे नातं आहे. सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपण कुलगुरू पर्यंतचा प्रवास केला आहे. यामध्ये सतत संघर्ष करून यश मिळवले आहे. करमाळा तालुका सर्वच दृष्टिकोनातून मागास असल्याने हा तालुका शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्याच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा आपला संकल्प आहे. जीवनामध्ये मी सर्व काही मिळवले आहे. पद पैसा प्रतिष्ठा मान मरातब सर्व गोष्टी मिळाल्या तरी ज्या जन्मभूमी मध्ये मी जन्मलो या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची तीव्र इच्छा आहे. करमाळा तालुका वासियाची सेवा करण्यासाठी विधानसभेला आपण उभा राहणार असून जनतेने मला संधी दिल्यास करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करून जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील अनेक मुला मुलींचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम केले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या अडचणीचे निवारण करून त्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. जनतेमधून माझ्यासाठी काहीतरी आपण करा अशी भावना असून माझी करमाळा तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे. नामवंत तीन पक्षांनी मला उमेदवारीसाठी विचारणा केली असून सर आपण करमाळा विधानसभा निवडणूक लढवणार असाल तर आमच्या पक्षाचा विचार जरूर करावा आशा भावना व्यक्त केल्या आहेत. मी सर्वांचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीत जो पक्ष आपल्या विचारानुसार करमाळा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची अभिवचन देईल आपल्या तत्त्वांना मुरड न घालता विकासाला प्राधान्य देण्याचे काम करेल त्या पक्षाकडून आपण निवडणूक लढवणार आहोत. मी फक्त एकदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहे सर्वसामान्य नागरिकांना मी आतापर्यंत केलेला जीवन प्रवास करमाळा तालुक्याच्या विकासासाठी असलेला आपला दृष्टिकोन शैक्षणिक दृष्ट्या करमाळा तालुका समृद्ध करण्यासाठी शाळा कॉलेज याचबरोबर उद्योग निर्मितीसाठी विविध प्रकल्प करमाळा तालुक्यात कशी येतील करमाळा तालुका ब्रँड कसा होईल या दृष्टिकोनातून आपले विचार मतदारासमोर घेऊन जाणार आहे.घराणेशाहीमुळे विकासाला ग्रहण लागले आहे.नुसता बदल झाला पाहिजे अशी बोलुन आपली जबाबदारी झटणारे आपण सर्वच लोक या परिस्थितीला जबाबदार आहोत आपल्या विकासाच्या दृष्टिकोनाला विचाराला प्राधान्य देऊन जनतेने मला मतदान करून निवडून दिले तर करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास नक्कीच करून दाखवणार असुन पुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे जनतेने माझ्या कार्याचा आलेख लक्षात घेऊन एक वेळ संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.