करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव मा.विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे आयोजित उच्च माध्यमिक इयत्ता बारावी कला,वाणिज्य व विज्ञान वर्गाची परीक्षा दिनांक 21/02/2024 पासून सुरू होत असून परीक्षा केंद्र
(421) वर 1296 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठीची बैठक व्यवस्था महाविद्यालयाच्या सुचना फलकावर विद्यार्थ्यांसाठी लावण्यात आलेली आहे. तसेच सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रथमोपचार कक्ष,शुद्ध पिण्याचे पाणी , वर्गामध्ये लाईट व फॅन अशी प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक दिवसी बैठक व्यवस्था बदलत असल्याने त्या बैठक व्यवस्थेची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. दिनांक 21/02/2024 इंग्रजी विषयाच्या पेपर दिवशी येणाऱ्या परीक्षार्थींचे उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागत करण्यात येणार आहे. तणाव विरहित मोकळ्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावीअसे आवाहन केले आहे . केंद्र क्रमांक ( 421) 12 वी परीक्षेसाठी सज्ज झालेले आहे. असे केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक यांनी सांगितलेले आहे. या परीक्षेच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 100 मीटर पर्यंत 144 कलम लागू आसल्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे दि. ६ जानेवारी २०२५…
करमाळा प्रतिनिधी- भाजपा नेते,भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करमाळा भाजपाकडून विविध कार्यक्रमांनी…
करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे उप प्रवर्तक प. पु. श्रुत मुनीजी म.सा…
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…