Categories: करमाळा

केत्तुर-ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव संमत- रेल्वे प्रशासनाला एक्सप्रेस गाडी थांब्याची केली मागणी


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील महत्वाचे व्यापारी केंद्र असणाऱ्या केत्तुर ग्रामपंचायतीने पारेवाडी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस( जलद) गाडीच्या थांब्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केलेली असुन, सन१९९६ साली याबाबत रेले रोको आंदोलन देखिल करण्यात आले होते. याच मागणी बाबत तब्बल २५ वर्षांपासून संघर्ष चालु असुन, आजपर्यंत रेल्वे विभागाने योग्य ती दखल घेतलेली नाही. चालु वर्षात देखिल येथील ग्रामस्थ प्रवाशांनी रेल्वे विभागाला व विद्यमान खासदार. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना अनेकवेळा निवेदने दिली असुन, कोणताही योग्य निर्णय अद्यापही झालेला नाही,२०२३ मधे येथील ग्रामस्थ, प्रवासी, शाळकरी मुले, महीला , ज्येष्ठ नागरिक यांनी एल्गार मोर्चा देखिल भव्य प्रमाणात काढला होता, त्यावेळी लवकरच एक तरी गाडीचा हॉल्ट या स्टेशनला देण्याचे रेल्वे विभागाने आश्वासित केले होते परंतु, लोकसभेची निवडणुक जवळ येऊनही काम झालेले नाही, त्यामुळे प्रवाशी बांधवां मधे प्रचंड नाराजी असुन, केत्तुर ग्रामस्थांसह जवळपासच्या दहा गावातुन लोकसभा मतदान प्रक्रीयेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जोर धरत आहे. केत्तुर ग्रामपंचायतीने याबाबत ग्रामसभे त निर्णय घेऊन निवडणुक आचारसंहीते पुर्वी गाडीला थांबा दिला नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असुन तसा ठराव संमत केला आहे. केत्तुर ग्रामपंचायती प्रमाणेच, पारेवाडी , वाशिंबे, गोयेगाव, सोगाव, राजुरी, उंदरगाव, हिंगणी, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, दिवेगव्हाण, देलवडी, सावडी, कुंभारगाव, रामवाडी, कात्रज, कोंढार चिंचोली, भगतवाडी- गुलमरवाडी या गावाचा देखिल बहिष्कार टाकला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदी सरकारच्या काळातही योग्य मागणीची दखल घेतली गेलेली नाही याची खंत असल्याची भावना केत्तुर येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन कटारिया यांनी आमचे प्रतिनिधी यांचेकडे बोलुन दाखविली.
*एक्सप्रेस गाडीला थांबा न दिल्यास मतदानावर बहिष्कार तर होईलच परंतु रेले- रोको आंदोलन देखिल करणार असल्याचे नागरिकांचा ठाम निर्णय झाला आहे.*

saptahikpawanputra

Recent Posts

राहुल रसाळ आणि कपिल जाचक ही ज्ञानाची विद्यापीठे… कमलाई कृषी प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन प्रसंगी डॉ. अविनाश पोळ यांचे करमाळा येथे प्रतिपादन.

करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…

6 hours ago

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

1 day ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

2 days ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

4 days ago