दि. १४/०२/२०२४ रोजी किंडरजॉय सी.एस.सी. बालविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अथर्व मंगल कार्यालय श्रीदेवीचामाळ येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. गणेश (भाऊ) करे-पाटील होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अंजली श्रीवास्तव (लेखिका), श्री. विशाल शिंपी ( सी.एस.सी. करमाळा तालुका समन्वयक), श्री. परदेशी (पत्रकार), श्री. राजेश गायकवाड (पत्रकार),श्री. दिनेश मडके (पत्रकार), डॉ. शेलार हे होते. अध्यक्षीय भाषणातून श्री. गणेश (भाऊ) करे-पाटील यांनी शाळेचे कौतुक करून शाळेसाठी एक एल. सी. डी. टेलीव्हिजन सेट सप्रेम भेट दिला. तसेच त्यांनी संस्थेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. कमलाई शैक्षणिक व बहुद्दीशीय संस्थचे अध्यक्ष श्री. धनराज कांबळे यांनी प्रस्तावना करून पाहुण्यांचा सत्कार केला. सर्व पाहुण्यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमाला पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमध्ये लहान मुलांनी आपल्यातील सर्वांगीण कालागुणांचे उत्कृष्ठ प्रदर्शन केले. कार्यक्रमामध्ये सर्व धर्म, बंधुभाव, आई वडिलांविषयीचा आदरभाव, प्रेम, संस्कृती या थीमवर गाणे सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . नंदकुमार वलटे यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी कोरिओग्राफर म्हणून सिद्धी कदम यांनी उत्तम रित्या कार्य केले. किंडरजॉय सी.एस.सी. बालविद्यालयाच्या संचालिका सौ. राजश्री कांबळे यांच्या मार्गदर्शखाली कार्यक्रम यस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ .मीनाक्षी ढाळे, सौ . सुप्रिया जोगदंड,सौ . सीमा खराडे,सौ .राबिया बागवान,सौ .अर्चना जाधव,सौ वंदना काळे यांनी अखंड परिश्रम घेतले
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…