करमाळा प्रतिनिधी हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती करमाळा यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे यामध्ये यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक सकाळी सात वाजता करण्यात येणार आहे. अभिषेक झाल्यानंतर करमाळा शहर व तालुक्यातील मुले व मुली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके मूलखांब लेझीम यांचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करणार आहेत. यानंतर भव्य रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजता सुरू होणार असून रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास छत्रपती शिवाजी महाराजा फोटो फ्रेम व सहा इंचाची मूर्ती भेट म्हणून देण्यात येणार आहे सदर रक्तदान शिबिर छत्रपती चौक करमाळा येथे सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये होणार आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास रक्ताची गरज भासल्यास त्यांनी मागणी केल्यास त्याला मोफत रक्त देण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध गावातील बँड बरोबर आकर्षक डेकोरेटर्स सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. करमाळा शहरातील माहि डेकोरेशनने आपल्या कलेद्वारे शिवप्रेमींचे लक्ष वेधले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास डेकोरेशन करून पुतळा भोवती आधुनिक पध्दतीने शामियाना उभा केला आहे .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने व्हावे सहभागी असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.