Categories: करमाळा

भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडी करमाळा तालुकाध्यक्षपदी संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडी करमाळा तालुकाध्यक्षपदी उद्योजक अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संघटना नाशिक केंद्र करमाळा तालुका अध्यक्ष राजुरी गावचे संतोष काका कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे ,शहराध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी निवड पत्र देऊन त्यांची निवड केली आहे. उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांनी एक शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही कुठलाही वारसा नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वकर्तुत्वावर क्लासिक ऑइल कंपनी सुरू केली. रोजगारनिर्मिती उद्योग व्यवसायिकांना त्यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी आहे असे मत गणेश भाऊ चिवटे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी उद्योजक विकास आघाडीच्या माध्यमातून करमाळा युवकांना मार्गदर्शन करून उद्योजक घडवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष काका कुलकर्णी यांचा हार फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे , किसन मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रजी ठाकूर , पत्रकार दिनेश मडके वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, सोमनाथ घाडगे, जयंत काळे पाटील, किरण शिंदे, शिवनाथ घोलप, संजय किरवे, शरद कोकीळ निलेश गंधे , निखिल बरूटे,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

16 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago