करमाळा प्रतिनिधी :- करमाळा शहरात करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल, तोलार, दिवाणजी, व्यापारी, राखणदार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. करमाळा येथील ‘ हमाल भवन ‘ येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक गोविंद किरवे, राजू आव्हाड , मनोज राखुंडे, दिपक सुपेकर, फारूक जमादार
संचालक मनोज गोडसे, विठ्ठल रासकर, वालचंद रोडगे, मयूर देवी, विकी शेठ मंडलेचा, विलास जाधव, राजकुमार सुरवसे, बाबा घोडके, देवा लोंढे , खलील मुलाणी, नंदू इरकर, आप्पा इंदुरे आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर करमाळा शहरातून हलगी व ताशा द्वारे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रताप आदी महापुरुषांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणुकी नंतर हमाल भवन याठिकाणी चिमुकली जान्हवी राहुल सावंत हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी करमाळा व तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, हमाल, तोलार, दिवाणजी , राखणदार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. यावेळी प्रदीप लुणिया, गणेश झोळ, रामा कारंडे, गोरख ढेरे, हरिदास मोरे, दादा हरगुडे, विजय रोडगे सर, परमेश्वर सावंत, उमेश हवालदार, मार्तंड सुरवसे, माऊली सुरवसे, पै. गणेश सावंत, शुभम केकाण, शरद वाडेकर, अतुल शिंदे, बापू बेंद्रे, विठ्ठल इवरे उपस्थित होते. यावेळी शिवजयंती निमित्त अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव लोंढे, गजानन गावडे, सोपान बारवकर, ज्ञानदेव गोसावी,संतोष कुकडे, अंकुश ढवळे, नानासाहेब मोरे, नामदेव फरतडे, दिनकर चव्हाण, प्रमोद गायकवाड , दिलीप गायकवाड, अनिल रासकर ,चतुर्भुज घाडगे, किशोर ताकतोडे, विठ्ठल गायकवाड, शकील शेख, सचिन चांदगुडे ,सतीश खंडागळे, राजेंद्र कांबळे, मोहम्मद पठाण, संजय गायकवाड, पप्पू रोडगे, शरद यादव, घोडेगावकर, सुभाष शेंडगे, हरिभाऊ मोहिते , महादेव कांबळे, लक्ष्मण कांबळे यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…