Categories: Uncategorized

परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या वतीने कोर्टी येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी: परिवर्तन प्रतिष्ठान राजुरी, साईदीप हॉस्पिटल अहमदनगर व करमाळा मेडिकोज गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश्वर हॉस्पिटल नुतनीकरण उद्घाटनानिमित्त शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते दु. ३ वाजेदरम्यान डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी या प्रशालेच्या प्रांगणामध्ये मोफत महाआरोग्य शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे आमदार मा.श्री. संजयमामा शिंदे व कर्जत – जामखेडचे आमदार मा.श्री. रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

परिवर्तन प्रतिष्ठान ही संस्था गेले दहा वर्षापासून सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून प्रत्येक वर्षी मोफत आरोग्य शिबीराचे नियोजन करत असतो , या शिबिरात 1356रुग्णांनी आपली तपासणी केली. या वर्षीचे सुपर स्पेशलिटी शिबीर असल्यामुळे त्याकरिता अहमदनगर येथील प्रसिद्ध सुपर स्पेशालिस्ट व प्रत्येक आजारावर तज्ञ असलेले डॉक्टर्सचा यात सहभाग होता. यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. किरण दिपक, डॉ. श्रीधर बधे, डॉ. गणेश मैड, न्युरो सर्जन डॉ. भुषण खर्चे, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. वैशाली किरण, इनटी surgeon डॉ. अमोल घाडगे, आयुर्वेदचार्य डॉ. बाबासाहेब गाढवे, डॉ. जिनेंद्र दोभाडा आदी डॉक्टरांनी यावेळी तपासणी केली.

या शिबिरात हृदयरोग, मेंदू-मणका विकार, अस्थिविकार, बालरोग, कॅन्सर, मधुमेह, नेत्रविकार, त्वचारोग, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व निवारण, आयुर्वेद, होमिओपॅथी तज्ञांकडून मोफत तपासणी, सल्ला व उपचार करण्यात आले. याबरोबरच या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, शुगर, रक्तदाब, इसीजी, अँजिओग्राफी इ. तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन, आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच तालुक्यातील गोर-गरीब व पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचारा संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी करमाळा मेडोकोज गिल्ड च्या सर्वंचं डॉक्टरांनी तसेच मनोजसेठ सोनार, दादासाहेब शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी करमाळा तालुक्यातील विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली आरोग्य सुविधा देण्याचा संस्थेचा मानस होता. कालच्या शिबिरात सर्व ग्रामस्थ, बंधू भगिनींनी दिलेला प्रतिसादाने आमच्या प्रयत्नाचे चीज झाल्याची भावना मनाला सुखावून गेली. असे संस्थेचे अध्यक्ष तथा शिबीराचे मुख्य संयोजक डॉ. अमोल दुरंदे व डॉ. विद्या दुरंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. या शिबिरानिमित्त येणाऱ्या सर्वासाठी सर्व गोळ्या औषधे देण्याची मोफत सुविधा देणे समाजाचे या स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल च्या मुख्याध्यापिका सौ चारुशीला जाधव मॅडम यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. सौ विद्या ताई दुरंदे यांनी केले.

*

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

7 days ago