महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब,उपमुख्यमंत्रीे देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजित (दादा)पवार ,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे(आरोग्यदूत)यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत , सहकक्षप्रमुख माऊली धुळगंडे सर तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे अरविंद मांडवकर ,रविंद्रजी ननावरे सर, जितेश देशमुख ,राहुल भालेराव, ऋषिकेश देशमुख, रोहित वायभासे , सागर झाडे लक्ष्मण सुरवसे दिपाली चव्हाण या सर्वांच्या सहकार्यामुळे ही रुग्णसेवा अधिक सुलभ होत असून यामुळे या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
एक वर्षा पूर्वी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवकुमार चिवटे यांची करमाळा तालुका सहकक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती.तेंव्हापासून आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनामुळे व पाठपुराव्यातून महाराष्ट्रातील ७ ते ८ जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना धर्मादाय अंतर्गत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून व अनेक गोरगरीब रूग्णांना हाॅस्पिटल च्या अवाढव्य बिलातून सवलत मिळवून दिल्या आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा सिंहाचा वाटा असून ७० पेक्षा जास्त रुग्णांना तब्बल ६० लाख रुपयांपेक्षा जास्त मदत मिळवून दिली आहे व तशी रुग्णांची यादी सादर केली आहे. हे फक्त मोठे बंधू मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी चे कक्षप्रमुख व मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी काम करण्यास दिलेल्या संधीमुळे शक्य झाले असल्याचे सांगितले.शिवाय चिवटे हे सर्व आपला परंपरागत मिठाई & हाॅटेल व्यवसाय संभाळत रुग्णसेवा करत आहे.खऱ्या अर्थाने शिवकुमार चिवटे यांनी मिळालेल्या जबाबदारीच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी संधीचे सोने केले असल्याचे मत रूग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.
या कार्यात त्यांना मोठे बंधू सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.महेश (दादा) चिवटे व करमाळा-माढा भा.ज.पा.विधानसभा प्रमुख, जिल्हा सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.गणेश (भाऊ) चिवटे यांचे योग्य मार्गदर्शन भेटत आहे. त्याचप्रमाणे करमाळा ता.शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख दिपक पाटने, नागेश चेंडगे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. तसेच या रुग्णसेवेच्या ईश्वरीय कार्यास शिवकुमार चिवटे यांच्या माध्यमातून त्यांचे व्यावसायिक, विविध राजकीय, सामाजिक गटात व पक्षात सक्रिय असलेले मित्र ओंकार(शेठ)ढाळे, प्रतिक(शेठ)गांधी,अभिजीत सरडे,दुर्गेश कोकीळ,सागर(शेठ)वनारसे,विक्रांत शिंदे, अजय पुराणिक,शिवम बरिदे,गणेश(शेठ) हलवाई,रोहित कोरपे (सिव्हिल इंजिनिअर), सुरज इंदुरे इ.गोरगरीब व गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्याचे कार्य निरपेक्षपणे पार पाडत आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…