Categories: करमाळा

रात्री राष्ट्रपती राजवट उठते,पहाटे शपथविधी होतो मराठा आरक्षणाचा निर्णय का होत नाही – श्री औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेपाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे.अवकाळी पाऊस दुष्काळ शेतीमालाचे कमी भाव त्यामुळे मराठा समाजात संकटात आहे. समाज आत्महत्या करत आहे. त्यामुळे आरक्षण गरजेचे असल्याचे मत निर्णय ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुप चे संस्थापक श्री औदुंबर राजे भोसले यांनी व्यक्त केले आहे .
कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले आहे. आणि कुणबी व मराठा एकच आहेत, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे, एवढे मोठे आंदोलन सुरू असताना देखील सरकार आरक्षण निर्णय घेत नाही.रात्री नियमबाह्य राष्ट्रपती राजवट उठते ,पहाटे मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो, कलम 370 हा उठवले जाते, राम मंदिराचा निकाल लागतो, सिंचन घोटाळा आरोप अजित पवार यांच्यावर होतो त्यांनी पक्ष प्रवेश केला की तो आरोप रद्द होतो, आदर्श घोटाळ्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर होतो पक्ष प्रवेश केला की रद्द होतो, एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप होतो पक्ष प्रवेश केल्याविरुद्ध होतो, हे सर्व होत असताना सरकार समाज नाराज होतो का जनता नाराज होते का याचा विचार करत नाही .फक्त मराठा व धनगर आरक्षण म्हटले की ओबीसी समाज नाराज होईल एसटी समाज नाराज होईल हे कारण दाखवून आरक्षण चा निर्णय घेतला जात नाही. आरक्षण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. चिरडण्याचा प्रयत्न होत आहे .आंदोलन करताना घात करण्याचा प्रयत्न होत आहे. आंदोलन कर्त्यावर बिन बुडाचे आरोप करून बदनाम करायचा प्रयत्न होत आहे. आरक्षण देण्याचे नाटक करून वकील सदावर्ते मार्फत कोर्टात याचिका दाखल होते, निकाल विरुद्ध लागतो. बहुजन समाजाला टार्गेट करायचे, नेत्यांना टारगेट करायचे, त्यांना निर्णयापासून पदापासून दूर ठेवायचे ,मुख्यमंत्री व्हायची वेळ आली की त्यांचा अपघात होतो ,खडसे मुख्यमंत्री व्हायचे म्हणले की त्यांना पक्षातून बाजूला केले जाते, पंकजाताई मुंडे विधानसभेला पराभव केला जातो, हक्कासाठी आंदोलन केले की मेटे साहेबांसारख्यांचे मृत्यू होतात,भुजबळ ,पडळकर, शेंडगे या नेत्याने पुढे करून मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न होतो, परंतु देशातील महाराष्ट्रातील मराठा ओबीसी सर्व एकच आहेत आणि कोणताही असा वाद होता व नाही आणि यापुढे देखील वाद होणार नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत ,एकत्र राहणार. हे सर्व षडयंत्र सरकार चालवणारे देवेंद्र फडणवीस करत आहेत.मांजराला वाटते मी डोळे मिटून चोरून दूध पीत आहे.परंतु मांजराचे डोळे मिटले असले तरी समाजाचे डोळे उघडे आहेत. हे सरकारने विसरू नये.आंदोलन कर्त्याच्या जीवाला धोका झाल्यास त्या सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, त्यांना समाज सोडणार नाही. असा इशारा औदुंबरराजे यांनी दिला आहे.पुढे बोलताना राजे म्हणाले आमची मागणी ओबीसीतून आहे .तुम्ही दहा टक्के वेगळे देत आहात, समाज किती टक्के आहे. दहा टक्के आरक्षण समाजाला योग्य आहे का, राज्य सरकारला 50 टक्के च्या पुढे आरक्षण द्यायचा अधिकार नाही, हे आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही. हे सर्वांना माहिती आहे फक्त समाजाला वेळ काढूपणाचे धोरण आहे .त्यामुळेआमची मागणी आरक्षणा ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणारच असा विश्वास औदुंबरराजे यांनी व्यक्त केला

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

1 day ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago