करमाळा (प्रतिनिधी) – मी आणि माझा परिवार हा आमदार संजयमामांचा समर्थक आहे आणि आजमितीला मामा तुमच्या सोबत असल्याने आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत,त्यामुळे तुमचा विजय निश्चित असल्याची ग्वाही ज्येष्ठ पत्रकार, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी दिली.
माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या करमाळा दौऱ्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, मकाई सह.सा.का.चे संस्थापक-माजी संचालक विवेक येवले यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विवेक येवले,ऍड.अपूर्व येवले यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला.यावेळी झालेल्या चर्चेत येवले यांनी खा.निंबाळकर यांच्याशी बोलताना करमाळा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे तुमच्या सोबत असल्याने आम्ही सगळे तुमच्याच सोबत असून तुमच्या कार्यतत्परतेमुळे तुमचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली.यावेळी सौ. सुप्रिया येवले,भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,जिल्हा भाजयुमो
अध्यक्ष शंभूराजे जगताप,माजी नगराध्यक्षा सौ.पुष्पाताई फंड,भाजपचे तालुकाध्यक्ष रामा ढाणे,सचिन वैकर,डॉ.जयंत कापडी आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…