भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने गाव भेट दौरा सुरू केले असून त्याच अनुषंगाने करमाळा शहरातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्त समर्थक त्यांच्या कुटुंबांना भेटी देण्याचे काम अभियानांतर्गत करमाळा शहरातील 24 कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खासदार या नात्याने आपण सर्व कामांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले. पुढे बोलताना ती म्हणाली की जातेगाव टेंभुर्णी रस्त्याचा प्रश्न असो दहिगाव कुकडी निधीचा प्रश्न असो मांगी तलाव कुकडी मध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव असो मराठी उपसा सिंचन योजना बाबतही आपण प्रस्तावित सर्व कामे शासनाकडे मंजूर करून घेतली आहे त्यामुळे येत्या दहा-पंधरा दिवसात आचारसंहिता लागेपर्यंत जेवढी कामे मंजूर करून घेऊन ती कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतही आपण सकारात्मक असून कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले रेल्वे थांबा बाबत बोलताना रणजीत नाईक निंबाळकर म्हणाले की आपण केम येथे रेल्वे थांबा दिला आता पारेवाडी रेल्वे येथेही थांबा देण्याबाबतचाही प्रस्ताव आपण दिलेला असून येत्या आचारसंहिता लागे पर्यंत तोही प्रश्न मार्गी लागून तांब्याचा प्रश्न मिटणार आहे जनतेने आपल्यावर विश्वास ठेवा आपण जनतेची सर्व कामे तुमचा सेवक म्हणून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बागल गट भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत बोलताना ते म्हणाले की आदिनाथ मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबत कारखान्याच्या प्रश्नासंदर्भात आपली वेळोवेळी चर्चा झालेली आहे .परंतु पक्षप्रवेशाबाबत आपल्याला या चार आठ दिवसात समजले आहे.बागलगटाचे काम चांगले आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नक्कीच भाजपची ताकद वाढणार असून आगामी निवडणुकीमध्ये भाजपाचे मताधिक्य वाढणार असल्याने त्यांचे भाजप प्रवेशाचे मी स्वागत करतो.लोकसभेला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच दिलेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहे आपले जी काही कामे राहिले असतील ती कामे करण्यास मी वचनबद्ध असून आपल्या सर्व प्रश्नांची सोडू नको मला पुन्हा पक्षाने हो तुम्ही संधी दिल्यास नक्की त्या प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा…
करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी…
करमाळा प्रतिनिधी भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे…
करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विकासकामांसाठी नागपुर हिवाळी अधिवेशनातुन बऱ्याच विकासकामांवर चर्चा होताना दिसत आहे.…