करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सन 2023- 24 अंतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाच्या 26 फेब्रुवारी 2024 च्या अध्यादेशाद्वारे 2 कोटी 25 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आ.संजयमामा शिंदे यांनी दिली .
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या मंजूर निधीमधून करमाळा तालुक्यातील पश्चिम सोगाव व कंदर येथे कब्रस्तान वॉल कंपाऊंड बांधणे व सुशोभीकरण करणे या कामासाठी प्रत्येकी 7 लाख, कंदर येथे ईदगाह वॉल कंपाउंड बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे 7 लाख, केम येथे रेल्वे लाईन लगत कब्रस्तान वॉल कंपाउंड बांधणे तसेच मुलाणी कोपरा ते पोपट खरवडे रस्ता सिमेंट काँक्रेट करणे या कामासाठी प्रत्येकी 5 लाख, साडे येथे कब्रस्तान परिसर सुधारणा करणे व पाणीपुरवठा सोय करणे 7 लाख, वडगाव येथे कब्रस्तान परिसर सुधारणा करणे व पाणीपुरवठा सोय करणे 7 लाख, पुनवर येथे कब्रस्तान वॉल कंपाऊंड बांधणे 5 लाख, गुळसडी येथे पीर साहेब दर्गा समोर सभा मंडप बांधणे 10 लाख, वाशिंबे येथे कब्रस्तान परिसर सुशोभीकरण करणे 7 लाख ,आवाटी येथे कब्रस्तान वॉल कंपाउंड बांधणे व सुशोभीकरण करणे 7 लाख ,दिवेगव्हाण येथे कब्रस्तान परिसर सुधारणा करणे व पाणीपुरवठा सोय करणे 7 लाख ,कामोणे येथे पीर देवस्थान समोर सभामंडप बांधणे 7 लाख ,जातेगाव येथे मेहबूब सुभानी दर्गा (शब्बीर पठाणचे शेतात ) सभामंडप बांधणे 7 लाख, उमरड येथे कब्रस्तान वॉल कंपाऊंड बांधणे व मदरसा जवळील परिसर सुशोभीकरण करणे 10 लाख, रावगाव येथे मज्जित जवळील परिसर सुशोभीकरण करणे 7 लाख या ग्रामीण भागातील कामांबरोबरच शहरातील मौलाली माळ येथे ईदगाह मैदान परिसर शुभीकरण करणे वॉल कंपाऊंड बांधणे 15 लाख, करमाळा शहरातील मा आयशा मज्जित व मदरसा मोहल्ला गल्ली येथे सभा मंडप बांधणे 10 लाख, , मुलाणवाडा दफनभूमी रावगाव रोड वॉल कंपाउंड बांधणे 10 लाख, फारूक जमादार घरासमोर सिमेंट काँक्रीट करणे व पेविंग ब्लॉक बसवणे 7 लाख, सुलेमानी मज्जित (आनंद बाग रोड )समोरील रस्ता कॉंक्रिट करणे 7 लाख या करमाळा तालुक्यातील कामांबरोबरच माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहर येथे नगरपालिका पाठीमागील कब्रस्तान वॉल कंपाउंड बांधणे 65 लाख ,टेंभुर्णी रोड लगत ईदगाह मैदान पेविंग ब्लॉक बसविणे 10 लाख असा निधी मंजूर झाला आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…