Categories: करमाळा

४ मार्चला डिजिटल मिडियाची बारामतीत राज्यस्तरीय कार्यशाळा हा महिला पत्रकारांचा महागौरव पुरस्काराने सन्मान *सुनेत्रा पवार यांची पहिलीच प्रकट मुलाखत “नटरंग फेम सोनाली कुलकर्णी घेणार-राजा माने

करमाळा प्रतिनिधी 
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिध्दगिरी कणेरी मठ येथे झालेल्या ठरावानुसार राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित येणाऱ्या कार्यशाळा मालिकेतील पहिली कार्यशाळा येत्या ४ मार्च रोजी बारामती येथे होत आहे.अशी माहिती डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली. या कार्यशाळेच्या निमित्ताने होत असलेली सौ.सुनेत्रा अजित पवार यांची प्रकट मुलाखत विशेष औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.सौ.सुनेत्रा पवार यांची प्रथमच होत असलेली ही प्रकट मुलाखत नटरंग फेम ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घेणार आहे.
महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने संघटनेच्यावतीने राज्यातील दहा कर्तबगार महिला पत्रकारांचा महागौरव राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करुन सन्मान केला जाणार आहे.११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.कार्यशाळेत पत्रकारांची निवडणूक काळातील आचार संहिता, डिजिटल माध्यमाचे अर्थकारण व नवे प्रवाह, गुन्हेगारीच्या बातम्या आणि कायदा आदी विषयांवर तज्ज्ञ मान्यवर विचार मंथन करणार आहेत.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच संघटनेची राज्य कार्यकारिणी व सदस्य परिश्रम घेत असल्याचे राजा माने यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago