Categories: करमाळा

बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल दिग्विजय बागल यांचा उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते समर्थकांसह भाजपात प्रवेश


करमाळा प्रतिनिधी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल दिग्विजय बागल यांनी आज आपल्या समर्थकांसह मुंबई येथे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, मकाई कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल, मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे मा. चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, आदिनाथ कारखान्याचे मा. व्हाइस चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती चिंतामणी जगताप, मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड, मकाई कारखान्याचे संचालक अनिल अनारसे, पुण्याचे विष्णू गर्जे,कलीम काझी सर, व्यापारी रितेश कटारिया, पोथरेचे नानासाहेब शिंदे, संदिप खटके पाटील करमाळ्यातील आनंदराव कांबळे व विकास भोसले यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

7 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

20 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

23 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago