करमाळा प्रतिनिधी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल दिग्विजय बागल यांनी समर्थकांसह मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला असुन रश्मी दिदी बागल यांना पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली असुन भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी निवडीचे पत्र घेऊन भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रश्मी बागल यांचे पक्षात स्वागत आहे. त्यांचे वडील स्व.दिगंबरराव बागलमामा यांनी सहकारक्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली होती. सर्वसामान्यांकरता करता त्यांनी काम केले. त्यांच्यानंतर रश्मी बागल यांनी त्यांच्या कामाचा वसा घेतला आहे. अतिशय संघर्षाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. अशा संघर्षाच्या काळात रणजितदादा त्यांच्याबरोबर होते. प्रवेश करताना त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. पूर्ण विश्वास ठेवला आहे. भाजप हे एक कुटुंब आहे. येथे सर्वजण एकमेकांची काळजी घेतली जाईल. रिटेवाडी उपसासिंचन योजनेतील अडचणी दूर केल्या जातील,भाजप पक्ष वाढीसाठी त्यांनी काम करावे त्यांच्या सर्व अडचणी आता कुटुंब म्हणून आम्ही दूर करणार आहोत आता त्यांनी चिंता करण्याची गरज नाही असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. यावेळी करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे मा. चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, आदिनाथ कारखान्याचे मा. व्हाइस चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती चिंतामणी जगताप, मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड, मकाई कारखान्याचे संचालक अनिल अनारसे, पुण्याचे विष्णू गर्जे,कलीम काझी सर, व्यापारी रितेश कटारिया, पोथरेचे नानासाहेब शिंदे, संदिप खटके पाटील करमाळ्यातील आनंदराव कांबळे व विकास भोसले यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…
करमाळा प्रतिनिधी सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा वारसा जपत ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून…
करमाळा : प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभूराजे जयवंतराव…
जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत.…