बेलाटी ता उत्तर सोलापूर येथे धनगर समाजाचे दोन दिवशीय पाचवे राज्य स्तरीय साहित्य संमेलन सुरु झाले. या संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार रामहरी रूपनवर तर उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते.
या संमेलनाच्या उद्घाटन सोहळा सत्रात राज्यभर आपल्या कार्य कर्तत्वाने सुपरिचीत असलेल्या समाजधुरीणांचा सन्मान करण्यात आला.
या मधे उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर यांचा सोलापूर विद्यापीठ नामांतर चळवळ , उजनी धरणग्रस्तांसाठीचा संघर्ष, धनगर आरक्षण चळवळ ,शिक्षण क्षेत्रात विध्यार्थी व शिक्षक यांच्या साठीचे योगदान, बाजार समिती कर्जमुक्त करणे ,या बहुमूल्य बाबीसांठी घोंगडी,शाल , सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी श्रीपाल सबनीस, माजी आमदार रुपनवर, संमेलन संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले,स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील, बाळासाहेब कर्णवर, संभाजी सूळ , प्राचार्य आर एस चोपडे ,प्रा बेडगणूर, प्रा सत्तूबर, सांगली नगरसेवक विष्णू माने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या प्रसंगी करमाळा तालुक्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते,आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टकले,पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे,करमाळा मेडीकोज गील्ड चे डाॅक्टर अशोक शेळके,शेलगाव वां येथील बाळू मामा हलगी ग्रुप, धायखिंडी येथील गझीढोल संघ आवर्जून उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…
करमाळा प्रतिनिधी सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा वारसा जपत ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून…
करमाळा : प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभूराजे जयवंतराव…
जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत.…