करमाळा तालुका रहिवासी संघाकडून करमाळा तालुक्यातील रहिवाशांच्या वतीने नवी मुंबई येथे आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले होते .या कार्यक्रमात नवी मुंबई रहिवाशी संघाच्या वतीने आ.संजयमामा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संजयमामा शिंदे मतदारसंघांमध्ये चांगले काम करत आहेत याची पोहचपावती म्हणून तसेच भविष्य काळातही त्यांच्या हातून याच प्रकारे लोकसेवा घडावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्काराला उत्तर देताना आ. संजयमामा शिंदे म्हणाले की, 2019 साली विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरकार स्थापन व्हायला झालेला विलंब, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले कामास सुरुवात होणार तोपर्यंतच कोरोनाचे नवे संकट आले .या संकटाचे रूपांतरही आपण संधीत केले. कोरोना काळात फक्त आरोग्यावरती खर्च केला जात होता. आपण करमाळा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था भक्कम आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करणे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करून 100 कॉटमध्ये रुपांतर करणे, दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वसाहत बांधणे ,ऑक्सिजन प्लांट सुरू करणे, एक्स-रे मशीन देणे , सिझेरियन विभाग सुरू करणे, अस्थिभंग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करणे,ॲम्बुलन्स देणे इत्यादी कामे आपण प्राधान्याने केली. नंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून युतीचे सरकार आले. त्यादरम्यान तालुक्यातील विकास कामांना मोठ्या प्रमाणावरती स्थगिती देण्यात आली. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर विकास कामावरील स्थगिती उठविण्यात आली त्यानंतर निधीचा ओघ तालुक्यात सातत्याने सुरू आहे अशी मांडणी आ. शिंदे यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत राऊत यांनी केले. सुरेश सारंगकर युवराज गोमे यांनी मनोगते व्यक्त केली .तर आभार भजनदास खैरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी श्री शशिकांत राऊत, आप्पासाहेब परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे ,चंद्रकांत मकर ,अमोल आमले ,सुरेश सारंगकर, एड. गायकवाड ,सुनील कुराडे, विजय ठाकर ,रॉबिन मढवी ,आबा सरक ,संजय घाडगे , दत्तात्रय लोंढे ,रमेश चोपडे, पंडित लेंगरे, सतीश शेलार, युवराज गोमे, सूर्यराज पतपेढी, संजय जाधव, भानुदास खैरे ,सचिन मस्तुद आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…