करमाळा प्रतिनिधी श्री. मकाई कारखान्याचे शेतकऱ्यांचे ऊस बीलाची रक्कम मिळावी म्हणून तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर दि. 29 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहनाचे तीव्र आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, मा. पोलीस निरीक्षक यांनी 31 जानेवारी रोजी मकाई कारखान्याचे बँकेत कर्ज मंजूरी नंतर शेतकऱ्यांचे थकीत ऊस बीलाची रक्कम देऊ आणि सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना ऊस बीलाची रक्कम मिळाली नाही. तसेच मार्गदर्शन ही मिळाले नाही कोणावरही कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी गुरूवारी सकाळी 11 वाजता पोथरे नाका, सावंत गल्ली येथून तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच करमाळा बंद चे आवाहन तात्पुरते स्थगित केले आहे. यावेळी ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर, वामनदादा बदे, रवींद्र गोडगे, राजेश गायकवाड सर, शहाजीराजे माने, हरिदास मोरे, बाळासाहेब गायकवाड, गणेश वाळुंजकर व शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केले आहे.
पंधरा महिने होऊनही अद्यापपर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही, आंदोलन होत असतानाही त्याचे गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलन कर्ते शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत .जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बील मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार असल्याचे ॲड राहुल सावंत यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…