Categories: करमाळा

मकाई साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल शेतकऱ्यांना  मामा यांच्या 13 मार्च जयंतीपुर्वी देऊन शेतकरी सभासदांना न्याय द्यावा-प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मकाईचे संस्थापक लोकनेते स्व दिगंबरराव बागल मामा यांच्या 13 मार्च जयंतीपुर्वी देऊन शेतकरी सभासदांना न्याय मिळवून द्यावा असे मत प्रा. रामदास झोळसर सर यांनी व्यक्त केले. मकाई सहकारी साखर कारखान्याचे मागील वर्षाचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी 29 फेब्रुवारी रोजी तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार होता बारावीच्या परीक्षा असल्याने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या परिसरामध्ये तत्कालीन चेअरमन यांचा बंगला असल्याने तसेच जमावबंदी आदेश असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ‌ हनुमान मंदिर सावंत गल्ली करमाळा येथेच मकाई सहकारी साखर कारखान्याची सभासद शेतकरी यांची सभा संपन्न झाली. त्याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे नेते दशरथ आण्णा कांबळे, कामगार नेते ॲड राहुल सावंत, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, हरीदास मोरे ,प्रा राजेश गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके ,जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, आदी मान्यवराच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी महिला भगिनी यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की गेल्या वर्षभरापासून शेतकरी बांधवांचे ‌ मकाई भैरवनाथ कमलाई या कारखान्याचे ऊस बिल मिळण्याबाबत विविध मार्गाने पाठपुरावा आंदोलन करत होतो .यामध्ये भैरवनाथ कमलाई कारखान्याने ऊस बिल दिले आहे .मात्र मकाई सहकारी साखर कारखान्याने एक वर्ष होऊनही शेतकरी सभासदाचे. ऊस बिल अध्यापही दिले नाही.ऊस बिल न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न, दवाखाना आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रपंच भागविण्यासाठी सावकाराकडून कडून काढलेली कर्ज यामुळे शेतकऱ्याची अवस्था न घर का ना घाट का अशी झाली आहे .अशा परिस्थितीतही आम्ही सौजन्याने वारंवार चेअरमन कार्यकारी संचालक मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून बिल देण्याबाबत सातत्याने विचारणा करून पाठपुरावा केला परंतु नुसती चालढकल करण्याचे काम ते करत आहे त्यामुळे आता तुमचे बँकेचे प्रकरण कधी होणार ते सांगा पण आमच्या शेतकऱ्याच्या उसाची हक्काची बिल मात्र लवकरात लवकर द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिल मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यातील भीमा टाकळी सहकारी साखर कारखाना, शंकर सहकारी साखर कारखाना यांनी मदत केली.त्याप्रमाणेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे बँकेचे प्रकरण मार्गी लावुन पैसे मिळवून देऊन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रा.रामदास झोळसर यांनी केली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपणाला सर्वसामान्य मतदारासमोर जायचे आहे जर खऱ्या अर्थाने शेतकरी हितासाठी आपण मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल देण्यासाठी यांचे बँकेचे प्रकरण मार्गी लावावे जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी आपल्या भाजप पक्षाच्या भूमिकेशी पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ आण्णा कांबळे ॲड राहुल सावंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे अंजनडोहचे उपसरपंच शहाजी माने यांनी मनोगत व्यक्त केले.‌ चिमुकल्या जान्हवी राहुल सावंत हिने मनोगत व्यक्त करून सर्वांचीच मने जिंकली.लोकनेते स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांची 13 मार्च रोजी जयंती असून या जयंतीपूर्वी स्व. दिगंबरराव बागल मामाचे आपण खऱ्या अर्थाने वारसदार व विचाराचे पाईक असाल तर 13 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे हक्काचे ऊस बिल जमा करावे अन्यथा आम्ही आपल्या घरावर मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे.जोपर्यत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आमचा लढा चालूच राहणार असल्याचे प्रा.रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे यावेळी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

5 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

6 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

20 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

20 hours ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

21 hours ago

सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌ जगावे-डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…

2 days ago