Categories: करमाळा

प्रा.महेश निकत यांना संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा राज्यातरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी 

शनिवार दि. 2 मार्च: महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू असलेले महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्याच सेवेसाठी काम करणारे संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांचा “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार” ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक प्रा. महेश निकत सर यांना जानेवारी मध्ये जाहीर झाला होता 2 मार्च रोजी संगमनेर येथे देण्यात आला.
सन्मान निष्ठेचा, गौरव कर्तुत्वाचा याप्रमाणे नाशिक पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब , शिक्षण महर्षी लक्षणरावजी पठाडे साहेब,राज्य सहकारी साखर कारखाना चे विद्यमान संचालक विवेक कोल्हे कोपरगाव ,शिर्डी लोकसभा चे माजी खासदार भावसाहेब वाघचौरे यांचे चिरंजीव रोहित वाघचौरे साहेब तसेच फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर सानप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मानपत्र, गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह, महावस्त्र, गौरव पदक देऊन हा सन्मान संगमनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पुरस्कार प्रेरणा देतात ; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते !
या विचारसूत्रावर आयोजित केलेल्या संजीवनी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या गुणीजन गौरव पुरस्कारामुळे पुढील कार्यात सर्व करमाळा तालुक्यातील विद्यार्थी पालक व इतर सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या सर्वच लोकांना घेऊन पुढील काळात आणखी खूप चांगले कार्य करत राहणार आहे असे प्रा निकत यांनी यावेळी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

8 mins ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

30 mins ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

15 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

15 hours ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

15 hours ago

सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌ जगावे-डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…

2 days ago