सर्वसामान्य जनतेला माफक योग्य तत्पर तात्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी पवार जनरल हॉस्पिटलचा महाआरोग्य शिबिर हा उपक्रम स्तुत्य -डाॕ.चंद्रकांत वीर

करमाळा प्रतिनिधी मानवी जीवनामध्ये आरोग्य ही माणसाला मिळालेली मोठी देणगी असुन माणसाच्या आरोग्याला समृद्ध करण्याचे काम वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून डॉक्टर देवदूताचे काम करीत आहेत करमाळा तालुक्यामध्ये आरोग्य जनजागृती बरोबरच सर्वसामान्य जनतेला माफक योग्य तत्पर तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी डॉक्टर पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिर हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ चंद्रकांत वीर यांनी व्यक्त केले
डॉक्टर पवार जनरल हॉस्पिटल विश्वराज हॉस्पिटल पुणे च्या संयुक्त विद्यमाने एक मार्च रोजी मोफत मारुती शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घघाटन ज्येष्ठ प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ चंद्रकांत वीर,डॉ रोहन पाटील ,जेष्ठ डॉक्टर श्रीराम परदेशी ,डॉ विठ्ठल पवार डॉ तानाजी जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्रयांच्या हस्ते करण्यात आले. व करमाळा मेडिकल असोसिएशन व करमाला मेडिकोज गिल्ड मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत वीर म्हणाले की परमेश्वराने डॉक्टरला देव दुतासारखे काम दिले आहे.मनुष्य जीवन दुःख मुक्त पीडा मुक्त करण्यासाठी प्रत्येक डॉक्टर शिवा भाऊ वृत्तीने काम करत आहे. करमाळा तालुक्यातील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली आहे. डॉक्टर पवार जनरल हॉस्पिटल करमाळा विश्वराज हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी विश्वराज हॉस्पिटल मधील दहा सुपरस्पेशालिटी तज्ज्ञांनी सेवा दिली . डॉ दर्शन गौड, डॉ प्रमोद सुर्वे, डॉ विक्रम पाटील, डॉ दर्शन गार्डे डॉ दोशीव इतर अनेक डॉकटर्सनी या शिबिरात सहाशे तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामद्ये रुग्णांना मोफत तपासणी , लॅबमधील रक्ताच्या तपासण्या , मोफत औषधे देण्यात आली .त्यांना जो आजार झाला आहे त्याची योग्य निदान लवकरात लवकर करून आवश्यक वाटल्यास शस्त्रक्रिया ही मापक दरात केल्या जाणार आहेत. करमाळा तालुक्यासारख्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना तपासणीसाठी शस्त्रक्रिया साठी पुणे नगर सोलापूर या ठिकाणी जाऊन तपासणी करावी लागत आहे यामध्ये वेळ पैसा याचा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता परंतु आता करमाळ्यामध्ये डॉक्टर रविकिरण पवार यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने तालुक्याबरोबरच जामखेड कर्जत राशीन टेंभुर्णी या भागातील ही या शिबिराचा लाभ झाला आहे. वेळेवर योग्य उपचार घेऊन रुग्ण बरा होत असल्याने नागरिकांतून यामुळे समाधान व्यक्त होत आहे.या शिबिराप्रसंगी डॉ लावंड,डॉ अविनाश घोलप, डॉ अक्षय पुंडे, डॉ सादिक बागवान, डॉ अनुप खोसे, डॉ गुंजकर अधीक्षक कुटीर रुग्णालय करमाळा, डॉ नागेश लोकरे, डॉ पोपट नेटके,डॉ.प्रमोद शिंदे, डॉ प्रशांत करंजकर, डॉ विशाल शेटे,डॉ महेश दुधे, डॉ हर्षवर्धन माळवदकर,डॉ राजेश तोरडमल, डॉ.विनोद गादिया,डॉ संदीप महाजन, डॉ निलेश जांभळे, डॉ मेहेर opthalmologist डॉ.संजय बुद्धवंन्त, प्रा महेश निकत,महेशजी चिवटे साहेब, नागेश चेंडगे पत्रकार,बाळासाहेब गोरे गुरुजी अशोक गायकवाड देवळाली,दादासाहेब पुजारी,महादेव भोसले, हेमंत बिडवे, सागर गायकवाड, उपस्थित होते.डॉ अजिंक्य पवार
डॉ प्रज्वल खेडकर यांच्या शैक्षणिक यशप्रित्यर्थ व पवार जनरल हॉस्पिटलच्या नूतनीकरणानिमित्त हे शिबीर आयोजित केले होते 
डॉ कमलेश किरण परदेशी , डॉ श्वेता काळे, दिपक मुंढे, वैभव गायकवाड सिद्धी मेडिकल व पवार हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांनी शिबीर यशस्वी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago