जीवनाला कलाटणी देणारा पुरस्कार असून या पुरस्काराने कार्यकर्त्याच्या कार्याचे सार्थक होते. त्यामुळे ज्यांना हा पुरस्कार मिळाले ते निश्चितच कर्तृत्ववान आहेत. त्यांची यापुढे आणखी जबाबदारी वाढलेली आहे; असे मत तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी व्यक्त केले.वरकुटे येथे शहिद जवान नवनाथ गात यांचे २१ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर व पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार नीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे हे होते.
यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे आक्क्रुड शिंदे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, गटविकास अधिकारी मनोज राऊत, क्षीतिज ग्रुप तर्फे डॉ. सुनिता दोशी, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार विजेते गजेंद्र पोळ तसेच डॉ. प्रा. अश्विनी भोसले व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ॲड. हिरडे यांची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करेपाटील, गटविकास अधिकारी मनोज राऊत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, देविदास ताकमोगे सर, जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप तळेकर, आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष आक्रुड शिंदे यांचेसह सत्कारमुर्ती गजेंद्र पोळ, शहिद जवान भारत कांबळे यांच्या पत्नी संगीता कांबळे, कुस्तीपटू कु. काजल जाधव, प्रा. डॉ. अश्विनी अशोक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना श्रीमती ठोकडे म्हणाल्या की, हा पुरस्कार सन २०१४ मध्ये मला मिळाला होता. त्यावेळी मला स्विकारण्यासाठी येता आले नाही. परंतु आज तो पुरस्कार माझ्या हस्ते वितरीत होत आहे, हे माझे भाग्य आहे. सुरुवातीला हा पुरस्कार मला जाहीर झाला आणि त्यानंतर तब्बल २०० पुरस्कार मला मिळाले आहेत. या सर्व पुरस्कारात शहिद जवान नवनाथ गात या पुरस्काराचे मोल हे सर्वांपेक्षा वेगळे आहे.यावेळी करमाळा येथील सामाजिक काम करणाऱ्या क्षीतिज ग्रुपला सामाजिक क्षेत्रातील सांघिक पुरस्कार देण्यात आला. यावेळी क्षीतिज ग्रुपच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. गजेंद्र पोळ तसेच श्रीमती संगीता कांबळे, कु. काजल जाधव, जि.प.शाळा खातगाव, निलेश भोसले, अक्षय शिंदे, अनिल माने, रत्नदीप जगदाळे, रोहिदास शिंदे, डॉ.प्रा. अश्विनी भोसले या सर्वांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मारक समितीचे सचिव निळकंठ ताकमोगे यांनी केले तर सुत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले. आभार नागन्नाथ गात यांनी मानले. सकाळी नऊ वाजता स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ८५ जणांनी रक्तदान केले. त्यानंतर ह.भ.प.गहिणीनाथ महाराज खेडकर यांचे किर्तन झाले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना या संस्थेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त कोरेगाव…
करमाळा प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने डॉ…
करमाळा प्रतिनिधी.प्रा निकत सरांचे ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त मा…
करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सह सीना माढा व भीमा सीना जोड कालव्यातून रब्बी पिकासाठी उद्यापासून…
करमाळा प्रतिनिधी - मोरवड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत…
करमाळा प्रतिनिधी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने 4 जानेवारी रोजी जेऊर येथे महा…