Categories: करमाळा

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा गुरूवारी जाहीर नागरी सत्कार


करमाळा प्रतिनिधी :                                                    शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात गुरुवार दि. ६ व ७ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यानुसार करमाळा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने बुधवारी व गुरुवारी हरीकिर्तनासह गुरुवारी मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर आणि चष्मे वाटप होणार असून वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या वाढदिवस सोहळ्याची सुरुवात बुधवार दि. ६ मार्च २०२४ सायंकाळी ७ ते १० ह.भ.प. योगिताताई डोंबाळे (डोंबाळवाडीकर) यांच्या हरीकिर्तनाने होणार असून वाढदिवसा दिवशी म्हणजेच गुरुवार दि.७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वा. माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि सांगोल्याचे आमदार शहाजी (बापू) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे (जडऊ मुख्यमंत्री कार्यालय), उद्योजक श्रीकांत पवार (मुंबई), उद्योजक पंढरीनाथसाटपे (मुंबई), उद्योजक रामभाऊ पवार (पुणे),राणा शिपिंग कंपनीचे चेअरमन राणा दादा सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण सावंत, शिवसेना माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, भाजपा जिल्हाप्रमुख केदार सावंत, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे, संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख चरण चवरे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजप नेते विलासराव घुमरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, कनपाचे माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बाजीराव चव्हाण (बीड), युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, मोहोळचे शिवसेना नेते राजू खरे, आंबेगाव खुर्द चे मा. सरपंच गणेश वनशीव, थेऊर चे मा. सरपंच युवराज काकडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आरती बसवंती आदीं मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
सत्कार सोहळ्यानंतर आरोग्य आणि रक्तदान शिबिराला सुरुवात होणार असून हे शिबिर सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. वाढदिवसानिमित्त दुपारी एक ते चार स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सत्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करमाळा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राहुल रसाळ आणि कपिल जाचक ही ज्ञानाची विद्यापीठे… कमलाई कृषी प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन प्रसंगी डॉ. अविनाश पोळ यांचे करमाळा येथे प्रतिपादन.

करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…

4 hours ago

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

1 day ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

2 days ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

4 days ago