करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी केली आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा माढा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विक्रमी मतांनी विजयी करणार आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे विकासप्रिय आमदार संजय मामा शिंदे हे करमाळ्याची नेतृत्व यशस्वीपणे करत आहेत तर माढा मतदारसंघातून त्यांचे जेष्ठ बंधू बबन दादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत आमदार म्हणून काम करत आहे. याचबरोबर सांगोल्यातून माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचेही सांगोल्यामध्ये जनमाणसांमध्ये राष्ट्रवादीबद्दल विशेष प्रेम व जिव्हाळा असल्याने ते राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रतिनिधित्व करत आहेत त्याचबरोबर माण येथे रामराजे निंबाळकर त्यांच्या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत .तर माळशिरसमधुन उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढली आहे.एकंदर माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदारसंघ आहे. येथील जनता नागरिक यांच्या मनामध्ये राष्ट्रवादी बद्दल विशेष प्रेम व जिव्हाळा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असणारा हा मतदारसंघ महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेसलाच सोडण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच मित्र पक्षाचे नेते यांच्याकडे केली आहे. शिवसेना भाजप मित्रपक्षांची या मतदारसंघांमध्ये भक्कम साथ लाभणार असल्याने विरोधंकाचा कुठल्याही प्रकारचा करिश्मा चालणार नाही.त्यामुळे आपण केलेल्या मागणीचा विचार करून माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यास येथील उमेदवाराचा विजय निश्चित आहे विक्रमी मताने माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असा विश्वासही राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी व्यक्त केला आहे.