Categories: करमाळा

स्त्री ही अबला  नसून सबला आहे हीच खरी राष्ट्रशक्ती असून अखिल विश्वाची स्त्री हिच जननी-संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी स्त्री ही अबला  नसून सबला आहे तरी हीच खरी राष्ट्रशक्ती असून अखिल विश्वाची जननी आहे . संसारिक जीवनामध्ये श्री माता भगिनी पत्नी मैत्रीण अशा विविध रूपा मधी आपली भूमिका बजावत असून स्त्रीशक्तीचा सन्मान करणे हीच खरी ईश्वर पूजा असल्याचे मत अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक करमाळा तालुकाअध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित  सत्कार समारंभामध्ये व्यक्त केले. महाशिवरात्री पर्व जागतिक महिला दिन असा दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा या संस्थेच्या वतीने करमाळा तालुक्यातील होतकरू व धडाडीच्या काम करणाऱ्या व उद्योजक महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा ग्राहक मंचच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ माधुरी परदेशी व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ. नीलिमाताई पुंडे यांची उपस्थिती होतीया कार्यक्रमाचे आयोजन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांनी केले
सो मंजिरी जोशी व सौ. सारिका सारंग पुराणिक यांनी कवितेचे वाचन केले तसेच किसन कांबळे सर आणि संजय राजे घोरपडे सर यांनी कवितेचे वाचन करून कार्यक्रमात रंगत आणली
उपस्थित सर्व महिलांनी आपण करत असलेल्या व्यवसायाचे व तो व्यवसाय कसा उभा केला यासंबंधीची माहिती आपल्या भाषणातून व्यक्त केली यामध्ये निशिगंधा शेंडे तसेच रेखा परदेशी यांनी आपण करत असलेल्या कामाची रूपरेषा सांगितली.तसेच माधुरी परदेशी यांनी आपले अनुभव सर्वांसमोर सांगितले त्या ग्राहक मंचाचे काम करतात.
तसेच निलिमाताई पुंडे यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातील अनुभव कथन केला आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली.वंदना पाटील मॅडम तसेच ललिता वांगडे यांनी अशा प्रकारचा सत्कार प्रथमच होतो आहे अशी भावना व्यक्त केली.तसेच यावेळी माधुरी भणगे,पूजा मसलेकर ज्योती कुलकर्णी , वैष्णवी कुलकर्णी उपस्थित होत्या
महिलांचे अनेक प्रश्न असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून असलेल्या माजी मुख्याध्यापिका सौ नीलीमाताई पुंडे यांनी केलेउपस्थित महिलांचा सत्कार अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक केंद्र करमाळा याचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीचे अध्यक्ष श्री संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास करमाळ्यातील प्रसिद्धसमाजसेवक किसन कांबळे सर यांनी जागतिक महिला दिन सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय राजे घोरपडे सर यांनी केले आणि आपल्या वाणीने कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
उद्योजक श्री संतोष काका कुलकर्णी यांनी आपण यशस्वी उद्योजक कसे बनलो याचे कथन केले व अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांच्या वतीने महिलांच्या समस्या सोडण्याकरता प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कै. वनमाला बबनराव वैद्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि हॅप्पी मॅरेज हॅपी हेल्थ फिटनेस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष महेश वैद्य यांनी केले
सध्या नशा मुक्त भारत अभियान केंद्र सरकार द्वारा नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर म्हणून ते काम करत आहेत सध्या बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात काम करीत आहेत. यांना आरोग्याची काळजी व फिटनेस महत्त्व समजले अशा व्यक्ती सहसा कोणत्याही नशेच्या आहारी जात नाहीत असा असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले व फिटनेस द्वारे नशा मुक्ती कशी होईल किंबहुना याकडे लोक कसे वळणार नाहीत याविषयी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम माधुरीताई परदेशी यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला सर्व महिलांचे उपस्थित राहिल्याबद्दल संतोष काका कुलकर्णी यांनी आभार मानले व कुठल्याही उद्योगात येणाऱ्या अडचणी विषयी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

4 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

10 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago