करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मध्य रेल्वेच्या पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांचे थांब्याचे मागणी करीता आज शनिवार दिनांक-९/०३/२४ रोजी असणारे रेल रोको आंदोलन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे ठोस आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय प्रवासी ग्रामस्थ व व्यापारी यांनी घेतला असुन, मागणी पुर्ण होणे पर्यंत लोकसभेच्या मतदान प्रक्रियेवर घेतलेला बहिष्काराचा निर्णय मात्र कायम ठेवला आहे. आज प्रवासी संघटने चे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ यांनी पारेवाडी रेल्वे स्टेशनला जाऊन याबाबतचे निवेदन स्टेशन प्रबंधक यांचे मार्फत तसेच पोलिस यंत्रणेचे अधिकारी यांना दिले. या प्रसंगी उपस्थितांनी रेल्वे बोर्ड व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेवर विश्वास व्यक्त करत तुर्तास रेल रोको स्थगित केल्याचे सांगितले, परंतु आमची मागणी मान्य न केल्यास रेल्वे बोर्डाचे विरुद्ध कोर्टात जाऊन सनदशीर परवानगीने रेल रोको पुन्हा करू असाही सुचक इशारा यानिमित्ताने दिला आहे. या प्रसंगी केत्तुर व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…