Categories: करमाळा

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे -आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
2023 च्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण राज्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे . अशा या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शेतकऱ्यांना दुष्काळाचे अनुदान मंजूर करणे याबरोबरच चारा छावणी, पाणी टँकर याबाबतीतही शासनाने पावले उचलली असल्याचे प्रतिपादन आ. संजयमामा शिंदे यांनी शुक्रवारी करमाळा येथील जनता दरबार प्रसंगी केले.दुष्काळी परिस्थितीविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील 40 तालुके हे दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केलेले आहेत. या 40 तालुक्यांसाठी शासनाच्या 29 फेब्रुवारी 2024 च्या अध्यादेशाद्वारे शासनाने तब्बल 2 हजार 443 कोटी 22 लक्ष निधी मंजूर केला असून या सर्व तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून प्रशासनाने शासनाकडे याद्या पाठविलेल्या होत्या. त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळालेली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाणार आहे. .सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा या 5 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुके सांगोला, करमाळा आणि माढा या 5 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुके म्हणून झालेला आहे. यामध्ये आपल्या करमाळा तालुक्यासाठी 146 कोटी 94 लक्ष् निधी मंजूर झाला आहे. लवकरच हा निधी महसुल विभागाच्या वतीने प्रत्येक खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे.

चौकट –

टँकर धोरणातही बदल… पूर्वी एखाद्या गावात पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव व लोकप्रतिनिधींची शिफारस ही कार्यालयाकडे पाठवली जात होती आणि त्याला मान्यता दिली जात होती, परंतु दुष्काळाची दाहकता ओळखून कागदपत्रे आणि प्रस्तावातील वेळ वाचावा या हेतूने नवीन टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून आता प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या गावाने टँकर मागणीचा प्रस्ताव प्रांत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्याला फक्त मेसेज करावा. तो मेसेज आपण तात्काळ प्रांत यांच्याकडे पाठवत असून हीच शिफारस गृहीत धरून गावांना टँकर मंजूर केले जात आहेत अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली. चारा टंचाईचा आढावा घेऊन भविष्यकाळात त्या दृष्टीनेही सरकार निश्चितच पावले उचलेल असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

23 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago