करमाळा प्रतिनिधी संघर्षमय जीवनातून जिद्द ,चिकाटी परिश्रम याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणारे शिक्षक नेते मुकुंद साळुंखे सर यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे मत भाजप अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले. माध्यमिक शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते या सत्कार समारंभास भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चंद्रकांत रांखुडे उद्योजक सतिश चोरमले सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गंभीर, पप्पु रांखुडे आदी मान्यवरांच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीत केक कापून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना दिनेश मडके म्हणाले की मुकुंद साळुंखे सर यांनी शिक्षक या नात्याने आदर्श काम केले असून माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष या माध्यमातुन शिक्षकांना न्याय मिळवुन देण्याचे काम केले असुन त्यांचे कार्य अविरतपणे चालु आहे.धन निरंकार मंडळाच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्य चालु आहे. मनुष्य जीवनामध्ये खरा पुरुषार्थ सांगितला असून आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे. जीवनात आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असो सत्याच्या व प्रामाणिकतेच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण मुकुंद साळुंखे सर यांचे आहे.स्वेच्छा निवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता सतत कामाची आवड ध्यास असलेले साळुंके सरांनी स्नॅक़स सेंटर सुरु केले आहे. याचा आदर्श युवा पिढीने घेऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करावा असे आवाहन त्यांनी केले.मुकुंद साळुंके सरांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून फोन सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी सत्काराला उत्तर देताना मुकुंद साळुंखे सर म्हणाले की मानवी जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी सेवा कार्य केले तर परमेश्वर नक्कीच आपणास साथ देतो जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन काम केल्यामुळे आपण सुखी समाधानी संप्पन आयुष्य जगत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.